शहरं
Join us  
Trending Stories
1
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
2
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
3
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
5
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
6
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
7
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
8
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
9
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
10
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
11
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
12
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
13
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
14
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
15
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
16
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
17
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
18
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
19
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
20
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी

साताऱ्याचा पारा ४० अंशाच्या उंबरठ्यावर...जिल्हा तापला: ३९.३ अंशाची नोंद

By नितीन काळेल | Published: April 12, 2023 8:20 PM

तीन दिवसांत चार अंशाने वाढ

सातारा : जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत असून बुधवारी तर सातारा शहराचे कमाल तापमान ३९.३ अंश नोंद झाले. त्यामुळे यावर्षातील हे उच्चांकी तापमान ठरले. त्याचबरोबर शहराच्या तापमानात तीन दिवसांत चार अंशाहून अधिक वाढ झाल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत.जिल्ह्यात यावर्षी थंडीचे प्रमाण कमी होते. त्यातच दरवर्षी मार्च महिन्यापर्यंत राहणारी थंडी फेब्रुवारीतच गायब झाली.

त्यावेळीच जिल्ह्याचा पारा वाढत गेला. तर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सातारा शहराचे कमाल तापमान ३७ अंशापर्यंत पोहोचले होते. यामुळे यंदाचा उन्हाळा असह्य करणार अशी भीती वाटत होती. मात्र, मार्च महिन्याच्या मध्शावर अवकाळी पावसाने दणका दिला. त्यामुळे तापमानात उतार आला. त्यावेळी सातारा शहराचा पारा तर २९ अंशापर्यंत खाली आला होता.

त्यानंतर तापमान वाढत गेले. पण, मार्च महिना संपेपर्यंत तापमान ३५ अंशापुढे गेले नव्हते. मात्र, एप्रिल महिना सुरू झाल्यानंतर तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यातच मागील आठवड्यात जिल्ह्यात वळवाचा पाऊस झाला. तसेच ढगाळ वातावरण तयार झालेले. पण, तापमान ३० अंशाखाली गेलेच नाही. उलट गेल्या चार दिवसांत पारा वाढत गेला आहे.

सातारा शहराचा पारा रविवारी ३४.८ अंश नोंद झाला होता. तर बुधवारी ३९.३ अंशाची नोंद झाली. अवघ्या तीन दिवसांत पारा चारहून अधिक अंशानी वाढला. यामुळे दुपारच्या सुमारास कडाक्याच्या उन्हाशी सातारकांना सामना करावा लागत आहे. तर रात्रीच्या सुमारास उकाडा हैराण करुन सोडत आहे.आगामी काळात तर पारा आणखी वाढणार आहे. यामुळे सातारकरांना कडाक्याचे ऊन आणि तीव्र उकाड्याशी सामना करावा लागणार आहे.

दरम्यान, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण. येथील पाराही वाढत चालला आहे. बुधवारी महाबळेश्वरला ३१.६ अंशाची नोंद झाली. त्यामुळे जागतिक पर्यटनस्थळही तापू लागल्याचे दिसून येत आहे. तर जिल्ह्याच्या पूर्व भागात कडक ऊन पडत आहे. त्यामुळे माण, खटाव, फलटण तालुक्यात शेती कामावर परिणाम झालेला आहे.

सातारा शहरात नोंद कमाल तापमान...

दि. १ एप्रिल ३४.०७, २ एप्रिल ३४.०८, ३ एप्रिल ३५.०७, ४ एप्रिल ३७.०५, ५ एप्रिल ३६.०२, ६ एप्रिल ३७.०५, दि. ७ एप्रिल ३५.०४, ८ एप्रिल ३२.०२, ९ एप्रिल ३४.०८, १० एप्रिल ३७, ११ एप्रिल ३८.०१ आणि दि. १२ एप्रिल ३९.०३

 

टॅग्स :satara-acसाताराsatara-pcसातारा