सातारा : ‘जिल्ह्यातील वाहतूक समस्या सोडविण्यावर पोलिसांतर्फे प्राधान्य देण्यात आले आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक नगरपालिका शहरातील पालिका प्रशासनाशी समन्वय साधून बैठका घेतल्या जातील. या बैठकीमध्ये संबंधित शहराचा वाहतूक आराखडा तयार करून दि. १५ आॅगस्टपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. वाहतूक आराखड्याच्या अनुषंगाने ज्या बैठका घेतल्या जातील, त्यांना संबंधित शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार यांचाही सहभाग घेतला जाणार असल्याचे सांगून पोलिस अधीक्षक म्हणाले,‘वाहतुकीच्या आराखड्यासंबंधाने सर्वसामान्य नागरिकांच्या काही सूचना, संकल्पना असतील तर त्या विचारात घेऊन आराखडा तयार करण्यात येणार आहे. आगामी काळात साजरे होणारे सण-उत्सवाच्या काळात वाहतुकीचे व्यवस्थापन परिणामकारक होऊन सर्वसामान्य नागरिकांना सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार आहेत. या अनुषंगाने हा वाहतूक आराखडा दि. १५ आॅगस्टपूर्वी तयार करून त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात होणार आहे.’सातारा जिल्ह्यातील सात उपविभागीय पोलिस अधिकारी व २९ पोलिस ठाण्यांमधील पोलिस अधिकाऱ्यांचे व्हॉट्सअॅप क्रमांकांवर नागरिकांना आपल्या सूचना व संकल्पना पाठविता येणार आहेत. सातारा उपविभागीय अधिकारी के. ए. धरणे (९९२२९९५८४६), दहिवडी वाय. ए. काळे (८२७५०४६२००), फलटण आर. चोपडे (९४२३३३६२१७), कऱ्हाड राजलक्ष्मी शिवणकर (८८८८६३११००), पाटण निता पाडवी (९९६०९४२२०४), सातारा शहर पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील (९४०३६०४०४०), कऱ्हाड शहर पी. व्ही. जाधव (९०१११२४३३३), कोरेगाव एस. एल. पांढरे (९९२३१३९७९), फलटण पी. जी. धस (९९२३१०२३८१), शाहूपुरी आर. सी. पिसाळ (९८८१२७८८५०) यासह जिल्ह्यातील इतर पोलिस ठाण्यांच्या पोलिस अधिकाऱ्यांशी नागरिक संपर्क साधू शकतात. (प्रतिनिधी) नागरिकांना आवाहन...जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनी वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या सूचना केल्या जातील, त्यांचा अंतर्भाव वाहतूक आराखड्यांमध्ये करण्यात येईल. दि. १० आॅगस्टपूर्वी नागरिकांनी त्यांच्या सूचना, संकल्पना नजीकचे पोलिस ठाणे, उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय, नगरपालिका येथील व्हॉट्सअॅप गु्रपवर पाठविण्याचे आव्हान पोलिस अधीक्षकांनी केले आहे.
सातारकरांनो... तुम्हीच ठरवा आता वाहतुकीचा आराखडा !
By admin | Published: July 21, 2016 10:55 PM