शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

लंडनमध्ये सातारकरांचा जल्लोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:30 AM

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाºया सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्येही यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस्तबद्धतेचे दर्शन तमाम लंडनवासियांना दिले. विशेष म्हणजे या मिरवणुकीचे व्यवस्थापन एका सातारकराकडेच होते.‘हौनस्लोव’ भागातील भारतीयांच्या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक ...

ठळक मुद्दे सार्वजनिक गणेशोत्सवात पुढाकार : थेम्स नदीकाठची मिरवणूक पाहून ब्रिटिश नागरिक चकितढोलाच्या तालावर जसं जमेल तसं ठेका धरायचा प्रयत्न करू लागली.

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : संपूर्ण महाराष्ट्रात डॉल्बी बंदीचा आदर्श निर्माण करणाºया सातारकरांनी आता सातासमुद्रापार जावून आपल्या उत्साहाचा झेंडा अटकेपार रोवला आहे. ब्रिटन देशातील लंडनमध्येही यंदा गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक काढून भारतीयांनी आपल्या शिस्तबद्धतेचे दर्शन तमाम लंडनवासियांना दिले. विशेष म्हणजे या मिरवणुकीचे व्यवस्थापन एका सातारकराकडेच होते.

‘हौनस्लोव’ भागातील भारतीयांच्या गणेशोत्सव मंडळाची विसर्जन मिरवणूक वाजत-गाजत हळूहळू थेम्स नदीकडं सरकू लागली, तशी बघ्यांची संख्या वाढू लागली. लंडनवासीयांसाठी हा प्रकार अनोखा होता. आगळा-वेगळा होता. काहीजणांच्या चेहºयावर आश्चर्य होतं तर काही जणांना उत्सुकता. ‘व्हिक्टोरिया’ नामक एक वयस्कर ब्रिटन महिलाही या मिरवणुकीत स्वत:हून सामील झाली. ढोलाच्या तालावर जसं जमेल तसं ठेका धरायचा प्रयत्न करू लागली.

खरंतर, तिला हे जमत नव्हतं, तरीही भारतीय गणेशभक्तांनी तिला सपोर्ट केला. चिअर-अप केलं. मग काय.. ब्रिटनच्या रक्तालाही जणू उधाण आलं. अस्सल मराठमोळ्या संगीतावर लंडनकरांचे पाय थिरकू लागले.या मंडळासाठी भारतातूनच गणेशमूर्ती मागविण्याचा निर्णय झाला. मुंबईतल्या अनेक मूर्तिकारांची नावं सर्च करण्यात आली. अनेकांकडून फोटोज्ही मागविण्यात आले. अखेर एक सुबक मूर्ती फायनल झाली. मुंबईहून लंडनला ही मूर्ती व्यवस्थित पाठविण्यासाठी एका कुरिअर कंपनीला ठेका देण्यात आला.आज ‘लोकमत’च्या ‘मंथन’ पुरवणीत...आजपावेतो घरगुती स्वरुपात साजरा केला जाणारा लंडनचा गणेशोत्सव यंदा मोठ्या थाटामाटात सार्वजनिकरित्या साजरा केला गेला. विसर्जनाच्या मिरवणुकीची जबाबदारी मूळ साताºयात राहणाºया एका तरुणाने स्वत:हून घेतली होती. श्रेयस शेटे यांच्या व्यवस्थापनाखाली निघालेल्या अनोख्या मिरवणुकीत ब्रिटिश नागरिकांनीही ढोल-ताशांच्या तालावर नृत्य सादर केले. त्याचीच चित्रकथा आजच्या ‘लोकमत’मधील ‘मंथन’ पुरवणीत पान ८ वर...लंडन शहरातील हौनस्लोव्ह भागात मराठी भाषिकांनी स्थापन केलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात साताºयातील तरुणांचा पुढाकार लक्षणीय होता.