सातारा : वर्षातील पहिल्याच अवकाळी पावसात भिजण्याचा आनंद सातारकरांनी शनिवारी सायंकाळी घेतला. सातारा शहरासह जिल्'ाच्या विविध भागांमध्येसकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. सायंकाळी चारच्या सुमारास सातारा शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. सुमारे अर्धा तास पावसाची रिमझिम सुरूच होती. सातारा शहरातील ढगाळ वातावरणामुळे सकाळी काहीकाळ अंधारून आले होते. सकाळी अकरानंतर सूर्यनारायणाचे दर्शन घडले. दुपारी तीननंतर पुन्हा काळे ढग जमा झाले. सायंकाळी चारनंतर पावसाचे थेंब पडण्यास सुरुवात झाली. रस्त्याच्या कडेला बसलेल्या किरकोळ विक्रेत्यांबरोबर नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. साडेचारनंतर पाऊस थांबला. त्यानंतरही बराच वेळ वेगाचे वारे वाहत होते. बामणोली : कास, बामणोली, तापोळा आदी परिसरात शनिवारी सायंकाळी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यामुळे जनावरांसाठी काढून ठेवलेला सुका चारा भिजला तसेच आंब्याचा मोहर गळाल्याने मोठे नुकसान झाले. मसूर : मसूर परिसरात पावसाच्या शिडकाव्याने शेतक-यांची चांगलीच धांदल उडाली, सध्या परिसरात रब्बीची शाळू, गहू, हरभरा आदी पिक ांची काढणी जोमाने सुरू आहे. या पिकांच्या काढणीवर पावसाचा परिणाम झाला. याचवेळी रस्त्यावर पळी सांडल्याने अनेक वाहने घसरून पडली. कुडाळ : जावळी तालुक्यात आज (शनिवार) दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा ज्वारी या पिकांवर दुष्परिणाम झाला. शेतकऱ्यांची हरभरा, गहू काढण्याची लगबग सुरू असताना पाऊस सुरू झाल्याने धांदल उडाली. तालुक्यातील आनेवाडी, कुडाळ, करहर, मेढा या परिसरात पावसाचा जोर चांगला होता. अवेळी पडलेल्या पावसामुळे जलपातळी वाढण्यास मदत झाली असली तरी रब्बी पिकांची मात्र, नुकसान झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. खंडाळा : खंडाळ्यासह परिसरात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांची धावपळ उडाली होती. कापून ठेवलेला गहू, हरभरा, ज्वारीचे नुकसान झाले. धान्य सुरक्षित ठिकाणी हलविण्यासाठी शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडली. पर्यटकांनी घेतला भिजण्याचा आनंद महाबळेश्वरमध्ये शनिवार, रविवारमुळे पर्यटकांची गर्दी होती. सकाळपासूनच ढगाळ वातावरण आणि वातावरणात गारवा जाणवत होता. सायंकाळी चारनंतर रिमझिम पावसाला सुरुवात झाली. या पावसात भिजण्याचा आनंद असंख्य पर्यटकांनी घेतला. (प्रतिनिधी/ वार्ताहर)
‘अवकाळी’च्या वर्षावात सातारकर चिंब
By admin | Published: February 28, 2015 11:58 PM