शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

अजिंक्यतारा किल्ल्यासाठी सरसावले सातारकर

By admin | Published: July 04, 2016 10:38 PM

सुचविल्या असंख्य सुधारणा : शिवसृष्टी प्रतिष्ठानकडून स्वागत

सातारा : साताऱ्याची अस्मिता असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याच्या स्मृती जतन करण्याच्या दृष्टीने सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने पाऊल उचलले आहे. या मोहिमेत सातारकर स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत आहेत. यासाठी अनेक सूचना त्यांच्याकडून येत असून, या सूचनांचे किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने स्वागत केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी मनात स्वातंत्र्याची महात्त्वाकांक्षा निर्माण केली आहे. हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हाच शिवशक्तीचा ऐतिहासिक वारसा आपल्या शाहूनगरीला लाभला आहे. सर्व भरत खंडाची राज्यसूत्रे अजिंक्यताराच्या, सातारच्या तक्तावरून २३ मे १६९८ ते १ सप्टेंबर १८४८ पर्यंत चालत होती. हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवरायांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदवी स्वराज्याची साक्ष देत असलेला अजिंक्यतारा किल्ल्याचा इतिहास नव्या पिढीला समाजावा, यासाठी किल्ले अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठानने किल्ल्याचे वैभव जतन करण्याचा निर्णय घेतला आहे. या मोहिमेत सातारकरांना सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. ‘अजिंक्यतारा व्हावा ऐसा सुंदर...’ या मोहिमेत सातारकर सहभागी होऊ लागले आहेत. अजिंक्यताऱ्याच्या संवर्धनात अपेक्षित बदल, त्यांच्या कल्पना सांगण्यासाठी ते पुढे येत असून, अनेकांनी काही सूचनाही केल्या आहेत. या सूचनांचे स्थापन करण्यात आलेल्या प्रतिष्ठानने स्वागत केले आहे. विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या अनुभवाचा, कल्पनांचा फायदा किल्ल्यांच्या संवर्धन प्रक्रियेत होणार आहे. (प्रतिनिधी)अजिंक्यातारा किल्ल्याचे जतन करताना जुन्या भिंती न पाडता पुरातत्व विभागाच्या पद्धतीने संवर्धन करणे गरजेचे आहे. किल्ल्यावरील रस्त्यांचे डांबरीकरण करण्याची आवश्यकता नसून त्याठिकाणी दगडीच रस्ते करावेत. त्यासाठी ऐतिहासिक वास्तूला धक्का लावण्याची गरज नाही.- प. ना. पोतदार, निवृत्त उपअभिरक्षक, पुरातत्व विभागअजिंक्यातारा हे ऐतिहासिक वैभव प्रेरणादायी आहे. हा इतिहास अंत:करणात उभा राहावा, यासाठी ऐतिहासिक पूर्व वैभवाची स्मृती जिती, जागती, तेवती राहावी, यासाठी अजिंक्यतारा शिवसृष्टी प्रतिष्ठान सतत कार्यरत राहणार आहे.- प्रा. डॉ. शिवाजीराव चव्हाण,सदस्य, सातारा जिल्हा हेरिटेज समिती