प्रगती जाधव-पाटील।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : साताºयात सहा वर्षांपूर्वी हिल मॅरेथॉन सुरू झाली आणि सातारकर धावायला लागले. पाहता-पाहता हे लोन जिल्हाभर पसरले. या मॅरेथॉनमुळे यातील काहीना ‘आयर्नमॅन’ने खुणावले अन् त्याचे लागिरं झाल्यासारखं सगळे धावायला लागले. अत्यंत खडतर समजल्या जाणाºया या स्पर्धेतून सातारा जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत तीन आयर्नमॅन तर दहा हाफ आयर्नमॅन झाले आहेत.मलेशियात नुकत्याच झालेल्या हाफ आयर्नमॅन स्पर्धेत योगेश ढाणे, हेमल उपाध्ये, डॉ. प्रमोद कुचेकर (सर्व सातारा) व प्रणिल भोईटे (फलटण) यांनी निर्धारित वेळेपेक्षा कमी वेळ नोंदवत ‘हाफ आयर्नमॅन’ हा किताब पटकावला. त्या स्पर्धेपाठोपाठ कोल्हापूर येथे १८ नोव्हेंबर रोजी डेक्कन ट्रायथलॉन हाफ आयर्नमॅन स्पर्धा झाली. त्यात साताºयाचे डॉ. दीपक निकम, डॉ. सुधीर पवार, सुभाष भोसले, अनुप मुथा, दिलीप पालवे व डॉ. संतोष यादव यांनी घवघवीत यश मिळविले.‘आयर्नमॅन’ हा शब्द गेल्या दोन-अडीच वर्षांत सातत्याने कानावर येत आहे. अत्यंत खडतर समजल्या जाणाºया या स्पर्धेत प्रथम कºहाड येथील जलतरण प्रशिक्षक ओंकार डेरे व क्षितिज बेलापुरे यांनी विक्रमी वेळ नोंदवत साताºयाचा झेंडा रोवला. गेल्यावर्षी मलेशियात फुल्ल आयर्नमॅन स्पर्धा झाली होती. पाठोपाठ साताºयातील डॉ. सुधीर पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी डेन्मार्क (कोपेनहेगन) येथील स्पर्धेत आयर्नमॅनचा किताब पटकावला. आतापर्यंत ‘फुल्ल आयर्नमॅन’ स्पर्धा विक्रमी वेळेत पार पाडणारे जिल्ह्यातील हे तिघेच खेळाडू आहेत.कोल्हापूर व दुबई येथील हाफ आयर्नमॅन स्पर्धा अनुप मुथा, डॉ. सुधीर पवार, दिलीप पालवे, डॉ. संतोश यादव (सर्व सातारा) व डॉ. आदीश पाटील (कोरेगाव) यांनी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. अशा क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. याविषयी बोलताना हाफ आयर्नमॅन विजेते सुभाष भोसले म्हणाले, ‘आयर्नमॅनसाठी फ्रान्स, हैद्र्राबाद, बेंगलोर येथील नामवंत प्रशिक्षकांचे मार्गदर्शन घेतले जाते. हे प्रशिक्षण आॅनलाईन चालते. खेळाडूला सरावाचे शेड्यूल्ड वेळापत्रक पाठविले जाते. त्या अंमलबजावणी केली जाते. सरावावर प्रशिक्षकांचे लक्ष असते.काय आहे ट्रायथलॉन !जलतरण, धावणे आणि सायकलिंग अशा तीन प्रकारांत ही स्पर्धा होत असल्याने तिला ट्रायथलॉन म्हणतात. स्पर्धकाला सलग तिन्ही प्रकारांत सामना करावा लागतो. फुल्ल आयर्नमॅन स्पर्धेत १८० किलोमीटर सायकलिंग, ४२ किलोमीटर रनिंग आणि ३.८ किलोमीटर स्वीमिंग हे अंतर १७ तासांत पूर्ण करावयाचे असते. या वेळातच स्पर्धा पूर्ण करणाºयाला ‘आयर्नमॅन’चा किताब मिळतो. याच्या निम्म्या अंतराची स्पर्धा ८ तास ३० मिनिटांत पूर्ण करणाºयास हाफ आयर्नमॅन म्हणतात!६० वर्षांचा तरुण !साताºयातील डॉ. दीपक निकम यांनी नुकतीच कोल्हापूर येथील ट्रायथलॉन पूर्ण केली. सुमारे दोन किलोमीटर पोहणे (१ तास ५ मिनिटे), ९० किलोमीटर सायकलिंग (३ तास ३० मिनिटे) व २१ किलोमीटर धावणे (२ तास १५ मिनिटे) असा टास्क डॉक्टरांनी विक्रमी वेळात पूर्ण केला. ६० वर्षांच्या या तरुणाने आजपर्यंत पाच हजारांहून अधिक किलोमीटर सायकलिंग, ४ हजार ५०० किलोमीटरपेक्षा जास्त रनिंग तर १०० किलोमीटरपेक्षा जास्त अंतर त्यांनी पोहून पार केले आहे. अनेक मॅरेथॉन स्पर्धांतून त्यांनी सुवर्ण, रौप्य व कास्य आदी पदके पटकावली आहेत.
मॅरेथॉनमुळे साताऱ्याला ‘आयर्नमॅन’चं लागिरं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2018 11:24 PM