शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

साताऱ्याचा पारा चाळीशीकडे सरकला, उकाड्यामुळे नागरिक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 2:19 PM

साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.

ठळक मुद्दे साताऱ्याचा पारा चाळीशीकडे सरकला, उकाड्यामुळे नागरिक हैराणयंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद

सातारा : साताऱ्याच्या पाऱ्याने चाळीशीकडे वाटचाल सुरू केली असून, बुधवारी शहराचे कमाल तापमान ३९.२ तर किमान २०.५ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे.गेल्या पाच दिवसांपासून उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या कालावधीत उन्हाच्या झळा अधिक जाणवू लागल्या आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी शहरातील प्रमुख मार्ग व बाजारपेठेत शुकशुकाट जाणवत आहे. नागरिक सूर्यास्तानंतरच खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत.ढगाळ वातावरण व जिल्ह्यात काही ठिकाणी झालेल्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना दिलासा मिळतो न मिळतो तोच बुधवारी पारा पुन्हा चाळीशीच्या उंबरठ्यावर येऊन स्थिरावला. बुधवारी हवामान विभागाच्या वतीने कमाल तापमान ३९.२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, यंदाच्या हंगामातील हे सर्वाधिक तापमान आहे. यापूर्वी सोमवार, दि. २५ मार्च रोजी पारा ३९.१ अंशांवर स्थिरावला होता. उन्हापासून बचाव व्हावा, यासाठी विविध प्रकारचे गॉगल्स, टोप्या, सनकोटसह शीतपेयांना मागणी वाढली आहे.उष्माघात ठरू शकतो घातकउष्णतेमुळे जाणवणारा दाहक परिणाम म्हणजे उष्माघात होय. यामध्ये शरीराचे तापमान अकस्मात उच्च पातळीवर जाते. योग्य ते उपचार वेळेवर न मिळाल्यास संबंधित व्यक्तीच्या मेंदूच्या उतींना नुकसान पोहोचून व्यक्ती कोमात जाण्याची व दगावण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी उन्हात फिरताना अथवा काम करताना योग्य ती खबरदारी घेणे अत्यंत गरजेचे आहे.

 

गेल्या पाच दिवसांतील तापमानदिनांक                तापमान                    कमाल    किमान२३ मार्च          ३७.८    १६.६२४ मार्च          ३८.६    १९.४२५ मार्च         ३९.१    २३.१२६ मार्च         ३८.७    २२.३२७ मार्च        ३९.२    २०.१अशी घ्याल स्वत:ची काळजी

  1. दररोज आठ ते सहा ग्लासपेक्षा जास्त पाणी प्यावे.
  2. नारळपाणी, ताज्या फळांचा रस, ताक, लिंबूपाणी घ्यावे.
  3. शक्यतो उन्हात बाहेर फिरणे टाळावे.
  4. फिरताना सोबत शक्यतो छत्री बाळगावी.
  5. ताजी फळे व फळभाज्यांचे अधिक सेवन करावे.
  6. मसालेदार, तेलकट व तिखट पदार्थ खाऊ नये.
  7. आहारात टरबूज, अननस, गाजर, काकडी यांचा समावेश असावा.
टॅग्स :TemperatureतापमानSatara areaसातारा परिसर