शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

साताऱ्याचा मिल्कमॅन नॉर्वेत झाला आयर्न मॅन ; अभय केळकर : जिद्द अन् चिकाटीचा अनोखा मिलाफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 12:41 AM

दोनवेळच्या अन्नासाठी पहाटे तीन वाजता त्याचा प्रवास सुरू व्हायचा. दोन तास काम केल्यानंतर तो ‘आयर्न मॅन’चं स्वप्न साकारण्यासाठी झगडायचा. दिवसाला इन मिन ३०० ते ४०० रुपये कमवणाºया अभयला सार्वत्रिकपणे खेळाडू घेतात तसं कसलंही ‘डाएट’ घेता आलं नाही;

ठळक मुद्देएक निर्भय योद्धा आणि एका मुलीचे पालकत्व ही जबाबदारी मला ऊर्जा आणि स्फूर्ती देते, असे सातारी बाण्याचे उत्तर अभयने नॉर्वेच्या रेडियो स्टेशनला मुलाखतीच्या दरम्यान दिले.

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : दोनवेळच्या अन्नासाठी पहाटे तीन वाजता त्याचा प्रवास सुरू व्हायचा. दोन तास काम केल्यानंतर तो ‘आयर्न मॅन’चं स्वप्न साकारण्यासाठी झगडायचा. दिवसाला इन मिन ३०० ते ४०० रुपये कमवणाºया अभयला सार्वत्रिकपणे खेळाडू घेतात तसं कसलंही ‘डाएट’ घेता आलं नाही; पण ‘आयर्न मॅन’ किताब पटकावण्याची त्याची आंतरिक ऊर्जा इतकी होती, की सर्व अडथळे लिलया पार करून तो यशस्वी झाला आणि तमाम सातारकरांच्या माना अभिमानाने उंचावल्या.साताºयात दूध विक्रीचा व्यवसाय करणाºया अभय केळकर याने जिद्द व चिकाटीच्या जोरावर जागतिक दर्जाच्या विक्रमाला गवसणी घातली आहे. रविवारी (३० जून) अभयने सायकलिंग, रनिंग व स्वीमिंग अशी २२६.७ किलोमीटरची अवघड व खडतर स्पर्धा पस्तीसाव्या क्रमांकाने पूर्ण करत ‘आयर्न मॅन’ हा किताब पटकावला. अशी भीमकामगिरी करणारा तो पहिला सातारकर ठरला आहे.

पहाटे तीन वाजता साताºयात नागरिकांना दूध वाटप करणारा अभय केळकर तंदुरुस्तीच्या बाबतीत जागरुक होता. प्रचंड जिद्द आणि आंतरिक ऊर्जा, या गुणांच्या जोरावर अभयने कोणत्याही साधन सुविधाशिवाय चार मॅरेथॉन पूर्ण करत सातारी बाणा दाखवून दिला. दूध वाटप व टेम्पो चालवून दिवसाकाठी तीनशे ते चारशे रुपये कमवणाºया अभयला डोंगरदºयात भटकण्याची आवड आहे. निसर्गात रमणाºया या पर्यावरण वेड्याने अनेक प्राण्यांचेच नव्हे तर माणसांचेही जीव वाचवले. कोयनेत पोहणे, सातारा-महाबळेश्वर-सातारा असा धावण्याचा सराव करणाºया अभयने कोल्हापूरमध्ये हाफ आयर्न मॅन मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली.

माणदेशी महिला बँकेच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांचा मुलगा प्रभात याने अभयमधील गुणवत्ता ओळखून त्याला नॉर्वेच्या ह्यूगसंडच्या मुख्य आयर्न मॅनच्या शर्यतीत उतरवले. १८० किलोमीटरचे सायकलिंग, ४.६ किलोमीटर पोहणे, आणि ४२ किलोमीटर धावणे तीन टप्प्यातला हा २२६ किलोमीटरचा प्रवास जिद्दीच्या जोरावर अभयने रविवारी रात्री नऊ वाजता १४ तास २७ मिनिटांमध्ये पूर्ण केला. कट आॅफ टायमिंग १६ तास ३० मिनिटांचे होते. पन्नास देशांचे स्पर्धक या शर्यतीत सहभागी झाले होते.

एक निर्भय योद्धा आणि एका मुलीचे पालकत्व ही जबाबदारी मला ऊर्जा आणि स्फूर्ती देते, असे सातारी बाण्याचे उत्तर अभयने नॉर्वेच्या रेडियो स्टेशनला मुलाखतीच्या दरम्यान दिले. अभयच्या या वाटचालीत प्रभात सिन्हा व माणदेशी परिवार, दिवंगत डॉ. संदीप लेले, कन्हैय्यालाल राजपुरोहित व शिवाजी उदय मंडळाचे मोलाचे सहकार्य राहिले आहे. 

केवळ मित्रांचा विश्वास आणि माझं कष्ट यामुळं मी ही स्पर्धा जिंकू शकलो. स्पर्धा जिंकल्यानंतर डोळ्यासमोर मुलगी स्वरा हिचा चेहरा आला. मला तिला बॉक्सर बनवायचे आहे. तिला रोल मॉडेल बनण्यासाठी मी आयर्न मॅन बनण्याची जिद्द उराशी बाळगली. अशक्य काहीच नाही, याची प्रचिती मला या स्पर्धेमुळे मिळाली. या किताबासह लेकीला भेटण्यात वेगळाच आनंद असणार आहे.- अभय केळकर, आयर्न मॅन, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरIndiaभारत