शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 4:11 PM

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.

ठळक मुद्देस्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण 

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला आहे,’ असे गौरवोगद्गार पालकमंत्री विजय शिवतारे यांनी काढले.येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित पालकमंत्री शिवतारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर ते बोलत होते. ध्वजारोहणानंतर पालकमंत्र्यांनी पोलिस, गृह रक्षक दलाची मानवंदना स्वीकारुन उपस्थित स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी व निमंत्रितांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. 

या सोहळ्यास जिल्हा परिषद अध्यक्ष संजीव नाईक-निंबाळकर, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख,  निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, उपवनसंरक्षक अनिल अंजनकर, आमदार आनंदराव पाटील, नगराध्यक्षा माधवी कदम आदी उपस्थित होते. 

पालकमंत्री शिवतारे म्हणाले, ‘सह्याद्रीच्या दºयाखोºयाचा लाभ घऊन सह्याद्रीच्या पट्यात येणाºया भागात मोठ्या प्रमाणात धरणांची निर्मिती केली आहे. त्यामुळे राज्यातीलच नव्हे किंबहुना देशातील सर्वाधिक धरण असलेला जिल्हा म्हणून साताºयाने नावलौकीक मिळविला आहे.

दुष्काळी भागातही पाणी पोहोचवून जनतेच्या शेतात पाण्याचे पाट देऊन  इथल्या जमिनी सुजलाम सुफलाम करण्याचे काम शासनाने केले आहे. जिल्ह्यातील जनतेने या पुनर्वसनासाठी मोलाची साथ दिली त्यातूनच राज्यात सर्वाधिक यशस्वी पुनर्वसन जिल्ह्यात झाले आहे.

कृष्णा, तारळी, धोम बलकवडी, उरमोडी, मोरणा (गुरेघर), वांग, उत्तरमांड, आंधळी, नागेवाडी, महींद, कवठे-कवळे, वसना, वांगणा, पांगारे या प्रकल्पातून १ लाख ३९ हजार २३९ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण झाली आहे. यातून २ लाख ५८ हजार २२९ हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. या प्रकल्पांमुळे बाधित होणाºया प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन ८२ गावठाणांमध्ये होणार असून आता पर्यंत ५७ गावठाणातील नागरी सुविधांची कामे पूर्ण झाली आहेत.  

  राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी अतिशय नियोजनबध्द अशी लोकांचा सहभाग असलेली जलयुक्त शिवार अभियान ही योजना सुरु करण्यात आली आहे असे सांगून पालकमंत्री शिवतारे पुढे म्हणाले, त्याचे दृश्य परिणाम सातारा जिल्ह्यात पहायला मिळत आहेत.

२०१६- १७ ला २१० गावांची जलयुक्त शिवार अभियानासाठी निवड करण्यात आली असून ६,७९७ कामे करावयाची होती. यापैकी ३,७८४ कामे पूर्ण झाली असून ७२७ कामे प्रगतीपथावर आहेत.  २०१६- १७ मध्ये  ४४ गावे जलयुक्त झाली आहेत.