पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात साताऱ्याच्या संकेतभाऊ क्रिकेट संघाने कऱ्हाडच्या यंगस्टार क्रिकेट संघाचा पराभव करून सेवागिरी चषकावर नाव कोरले. ६१ हजारांचे बक्षीसही पटकावले. उपविजेत्या संघाला ४१ हजारांचे बक्षीस मिळाले.अंतिम सामन्यात सातारा संघाच्या बबलू पाटीलने ३७ चेंडूत ८८ धावा केल्या. त्याने ८८ धावांच्या तडाखेबंद खेळीत ९ षटकारांची बरसात केली. स्पर्धेत २४ ग्रामीण व शहरी भागातील आठ संघांनी सहभाग घेतला. आयपीएलच्या मुंबई इंडियन्सच्या संभाव्य संघातील कृष्णा सातपुते, सोहम शेख, एजाज कुरेशी, योगेश पेणकर, बबलू पाटील, प्रथमेश पवार, अफझल शेख, पंकज जाधव, शाहुराज भोसले, रब्बानी, बल्ली (कर्नाटक), मोहसीन शेख (मध्यप्रदेश) हे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते.स्पर्धा पार पाडण्यासाठी किशोर मदने, सागर वसव, विशाल सोनवणे, शुभम जाधव, योगेश भोसले, आकाश जाधव, सूरज जाधव, सागर जाधव, संदीप जाधव, प्रसाद मोहिते, सिद्धेश घाडगे, सचिन मोहिते, प्रीतम गौडा, नागेश सोनवणे यांनी प्रयत्न केले. सुहास चव्हाण, महेश साळुंखे, स्वप्नील चव्हाण, मनोज वाघेला, शुभम जाधव यांनी पंच म्हणून काम पाहिले. नरेश ढोमे व प्रवीण गायकवाड यांनी सामन्यांचे समालोचन केले. विजेत्या संघाना मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त मोहनराव जाधव, योगेश देशमुख, रणधीर जाधव, प्रताप जाधव, सुरेशशेठ जाधव यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
साताऱ्याचा संघ ‘सेवागिरी’ चषकाचा मानकरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2017 12:31 AM
पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या रोमहर्षक अंतिम सामन्यात साताऱ्याच्या संकेतभाऊ क्रिकेट संघाने
ठळक मुद्देपुसेगावात क्रिकेट स्पर्धा कऱ्हाडच्या यंगस्टार संघाचा केला पराभव क्रिकेट रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद