शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी, खर्गे, सुप्रिया सुळेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
2
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
3
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
4
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
5
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
6
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
7
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
8
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
9
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
10
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
11
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
12
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 
13
दहा अंकी मोबाईल नंबर तरुणाला करणार करोडपती? साउथच्या सिनेमाने घातलाय 'गोंधळ'; वाचा नेमकं प्रकरण
14
कॅनडातील विमानतळांवर भारतीयांची अतिरिक्त तपासणी होणार नाही; या घोषणेनंतर ट्रुडो सरकारने निर्णय बदलला
15
Adani प्रकरणी SEBI ची पहिली प्रतिक्रिया; अमेरिकेच्या आरोपांवर केलं 'हे' वक्तव्य
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'नवरीचा पत्ता नाही आणि यांनी लग्नाची तयारी केली'; नारायण राणेंचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल
17
'भाजप सरकार आल्यावर वीज अन् पाण्याची बिले भरावी लागतील', अरविंद केजरीवालांचे टीकास्त्र
18
IND vs AUS : 'जानी दुश्मन' ठरला एकदम 'सस्ता'; हर्षित राणाची पहिली विकेट एकदम झक्कास (VIDEO)
19
कॅनडा झालं सुतासारखं सरळ! आता म्हणे- निज्जर हत्याकांडात भारताचा कुठलाही समावेश नाही!
20
पंढरपूर, मंगळवेढ्यासह प्रमुख ३० गावे ठरवणार नवीन आमदार; तुतारी, इंजिन कुणाच्या विजयाचे गणित बिघडवणार?

Satara: रणधुमाळी पाटणची, पण धुरळा मुंबईत उडणार; देसाई, पाटणकर गटासह उद्धवसेनेचेही चाकरमानी मतदारांवर लक्ष

By दीपक देशमुख | Published: October 22, 2024 4:06 PM

पाटणकर, कदम यांच्या भूमिकेकडे लक्ष

दीपक देशमुखसातारा : पाटण विधानसभा मतदारसंघातील जवळपास ४० हजार मतदार मुंबईत कामानिमित्त वास्तव्यास असल्याने मतदारसंघांची रणधुमाळी पाटणपुरती मर्यादित न राहता मुंबईपर्यंत प्रचाराचा धुरळा उडणार आहे. पाटणकर आणि देसाई गटांचे मुंबईतील कार्यकर्ते कामाला लागले असताना उद्धवसेनाही यात उतरली आहे. गेल्या अडीच वर्षांपासून पक्षाने मुंबईतील निर्णायक मतदानावर लक्ष केंद्रित केले आहे.पाटण मतदारसंघातील रणसंग्राम आतापर्यंत पाटणकर आणि देसाई या दोन गटांत होत आला आहे. या मतदारसंघात आतापर्यंत पक्ष कोणताही असो, देसाई आणि पाटणकर या दोन गटांतच पारंपरिक लढत होत आली आहे. दोन्ही गटांनी चुरशीने झुंज दिली आहे. याठिकाणी प्रत्येक गावातील एकेक मतदानासाठी दोन्ही गट प्रयत्नशील असतात. पाटणचा मतदार माथाडी कामगार तसेच इतर अनेक नोकरी, व्यवसायानिमित्त मुंबईत स्थायिक असून, सुमारे ४० हजारांहून अधिक मतदार येथे आहेत. मतदारांना आपल्याकडे वळवून घेण्यासाठी दोन्ही गटांनी कसोसीने प्रयत्न सुरू केले आहेत.त्याचप्रमाणे मुंबईतील उद्धवसेनेनेही पाटणवर लक्ष केंद्रित केले आहे. देसाई आणि पाटणकर यांचे गट मुंबईतल्या या मतदारांशी संवाद साधत असताना पाटणमधील उद्धवसेनेनेही अडीच वर्षांपासून मुंबईत राबता ठेवला आहे. यामुळे पाटणच्या लढ्यात ट्विस्ट आला आहे. रणधुमाळी पाटणची असली तरी धुरळा मुंबईतदेखील उडणार हे मात्र नक्की.पाटणकर, कदम यांच्या भूमिकेकडे लक्षमुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडात पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मोठी भूमिका बजावली. मात्र, हा निर्णय न पटलेले पाटणमधील अनेक शिवसैनिक उद्धवसेनेतच राहिले. त्यांचे नेतृत्व हर्षद कदम करत आहेत. पाटणचा विद्यमान आमदार पक्ष सोडून गेला तरी कदम यांनी उद्धवसेनेतून उमेदवारी मागितली आहे. त्यांनीही गेल्या अडीच वर्षांपासून पनवेल, ऐरोलीपासून ते मुलुंड, कुर्ला, दादरपर्यंत मुंबईल्या भागवाल्यांशी संपर्क ठेवला आहे. सत्यजीत पाटणकर आणि हर्षद कदम एकत्रित येऊन पाटणमध्ये महायुतीला आव्हान देणार की, त्यांच्यातच रस्सीखेच होणार याकडे मतदारसंघाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४satara-acसाताराpatan-acपाटणShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरे