शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

नायगाव येथे उभारणार सावित्रीसृष्टी : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2019 11:52 PM

खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची ...

ठळक मुद्देविविध कामांचे प्रस्ताव तयार करण्याचे जिल्हा प्रशासनाला आदेश

खंडाळा : ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांनी तत्कालीन समाजाला सामाजिक क्रांतीची नवी दृष्टी दिली. पुरोगामी महाराष्ट्राची मुहूर्तमेढ त्यांनीच रोवली. महाराष्ट्राचे हे पुरोगामित्व मागे जाऊ देणार नाही. फुले दाम्पत्याचा समतेचा संदेश जगभर पोहोचविण्यासाठी नायगाव येथे ‘सावित्रीसृष्टी’ निर्माण करणार आहे,’ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

नायगाव, ता. खंडाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८८ व्या जयंती सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, जलसंपदा मंत्री प्रा. राम शिंदे, पालकमंत्री विजय शिवतारे, सहपालकमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, आ. जयकुमार गोरे, आ. शंभूराज देसाई, आ. मनीषा चौधरी, कमलताई ढोले-पाटील, महापौर राहुल जाधव, बापूसाहेब भुजबळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, नायगावचे सरपंच निखील झगडे तसेच जिल्हा परिषद व खंडाळा पंचायत समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘तत्कालीन काळात महिलांना अधिकार नाकारले गेले, तेव्हा फुले दाम्पत्याने लढा उभारला. सनातनी, रुढीवादी यांचा विरोध झुगारून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ उभारली. समाजात मुली, महिला पुढे जाताना दिसतात, यामागे सावित्रीबार्इंच्या कार्याची प्रेरणा आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानातून समतेचा पुरस्कार करण्याची प्रेरणा महात्मा फुले यांच्याकडून मिळाली. हाच समतेचा विचार महाराष्ट्रात यापुढेही जोपासला जाईल. देशातील महिला व वंचितांसाठी फुले दाम्पत्याने भरीव काम केले आहे. संत सावता माळी यांचे जन्मगाव असणाऱ्या अरणचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला असून, तेही काम वेगाने मार्गी लावणार आहे.’

नायगाव ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘बेटी बचाव-बेटी पढाओ’ या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी करणाºया आर्या देशपांडे, जनाबाई हिरवे, यशस्वी साळुंखे आणि प्रांजल साळुंखे या मुलींचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सावित्रीबार्इंचा विचार घराघरात पोहोचण्यासाठी ‘सावित्रीसृष्टी’ उभारण्याबरोबरच नायगावला ‘ब’ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा, महिलांसाठी कौशल्य विकास केंद्र यासह कटगुण येथील महात्मा फुले स्मारकाचा विकास, पुणे येथील भिडे वाड्यात स्मारक, नायगाव ते मांढरदेव नवीन रस्ता, मुलींसाठी आयटीआयमध्ये वाढीव जागा, अरण येथील संत सावता महाराज मंदिराचा विकास, नीरा देवघर उपसा सिंचन योजना पूर्ण करणे अशा विविध मागण्यांना मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली.जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांनी स्वागत केले. सरपंच निखील झगडे यांनी प्रास्ताविक केले तर उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी आभार मानले.सावित्रीच्या पोवाड्याने उपस्थित मंत्रमुग्धनायगाव येथील स्मारकापासून सभास्थळापर्यंत सावित्रीमाईच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. येथील महिलांच्या ढोल पथकाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तर कार्यक्रमस्थळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या गीतमंच पथकाने सादर केलेल्या सावित्रीच्या पोवाड्याने सर्वांना मंत्रमुग्ध केले. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस