शहरं
Join us  
Trending Stories
1
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
9
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
10
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
11
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
12
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
13
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
14
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
15
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
16
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
17
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
18
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
19
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
20
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य

‘धोम-बलकवडी’च्या पाण्यात घोटाळा-: धरण बचाव समितीचा कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 04, 2019 10:10 PM

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात ...

ठळक मुद्देअधिकाऱ्यांविरोधात तक्रार

सातारा : धोम-बलकवडी धरणाच्या प्रकल्प मंजुरीमध्ये बेकायदा बदल करून जलसंपदा विभागाने रब्बी हंगामासाठी पाणी सोडले आहे, हे पाणी सोडण्यात मोठा घोटाळा करण्यात आला असून, संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत धोम धरण पाणी बचाव संघर्ष समितीतर्फे सोमवारी जलसंपदा विभागाच्या अधीक्षक अभियंत्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.

धोम धरणाच्या वरच्या बाजूला धोम-बलकवडी हे धरण बांधण्यात आले. भोर, खंडाळा, फलटण या तीन तालुक्यांतील १८ हजार १०० हेक्टर क्षेत्रासाठी केवळ खरीप हंगामात पाण्याची सोय होण्यासाठी धोम बलकवडी धरणाची निर्मिती करण्यात आली. हे स्पष्ट असताना देखील जलसंपदा विभागाच्या अधिकाºयांनी बेकायदा केंद्रीय जल आयोगाची व कृष्णा पाणी वाटप लवाद यांची परवानगी न घेता महाराष्ट्र शासनाची परवानगी घेऊन आठमाही पीक रचना मंजूर केल्याबाबत भासवून रब्बी हंगामाकरिता पाणी सोडण्याचे बेकायदा कृत्य केले आहे. धोम बलकवडी धरणातून २.७० टीएमसीपेक्षा जास्त पाणी वापरले आहे.

ही वस्तुस्थिती असताना अधिकाºयांनी डीपीआरमधील तरतुदींचा भंग करून बेकायदा धोम-बलकवडी कालव्यात २.७0 टीएमसी पेक्षा जास्त पाणी धोम-बलकवडी धरणातून सोडले. याउलट धोम धरणातून लाभ क्षेत्रातील सातारा, कोरेगाव, जावळी, वाई तालुक्यांतील शेतीसाठी पाणी सोडले नाही. शेतीचे पाणी कमी पडल्याने तसेच ते वेळेत न सोडल्याने शेतकºयांचे कोट्यवधींचे नुकसान झाले.

याप्रकरणी संबंधित अधिकाºयांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात चंद्रकांत बर्गे, माणिकराव भोसले, हणमंत जगदाळे, रणजित फाळके, राजेश बर्गे, पृथ्वीराज बर्गे, अर्जुन भोसले, उत्तम बर्गे, महादेव भोसले, शिवाजीराव माने, युवराज बर्गे, प्रताप बर्गे, जगदीश पवार, नंदकुमार माने, संतोष नलावडे यांनी सहभाग घेतला. दरम्यान, याप्रकरणी संबंधित अधिकाºयांविरोधात गुन्हे दाखल करण्याबाबत कोरेगाव व रहिमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याचेही समितीतर्फे दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे.धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्गधोम-बलवकडी धरणातून मंजूर डीपीआरनुसार २.७५ टीएमसी पाणी सोडण्याची मर्यादा आहे. सन २०१३ ते आजअखेर मंजूर डीपीआरचा भंग करून ३ टीएमसीपेक्षा ज्यादा पाण्याचा विसर्ग कालव्यात करण्यात आला, असा आरोपही संघर्ष समितीने केला आहे.

 

टॅग्स :DamधरणSatara areaसातारा परिसर