शहरं
Join us  
Trending Stories
1
"श्रीलंकेतून ३७ तमिळ मच्छिमारांची सुटका करावी", राहुल गांधींचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांना पत्र
2
"सर्व मुस्लिम देशांनी एकत्र येऊन इस्रायलशी लढावं", इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनेई यांचं आवाहन 
3
"रस्त्यावर हरे कृष्ण-हरे राम करताना दिसतील..."; श्रीकृष्ण जन्मभूमीचा उल्लेख करत काय म्हणाले CM योगी?
4
सौंदर्याचा 'सन्मान'... समंथाला मिळाला विशेष पुरस्कार, सोहळ्यातील 'हॉट लूक'वर खिळल्या नजरा
5
"जर मी 3-4 महिने आधी सुटलो असतो तर...", अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
6
अटल सेतूवरील यंत्रणा ITMS प्रणालीसाठी अकार्यक्षम; परिवहन विभागाच्या चाचणीत निष्पन्न
7
जय शाह यांचा ऐतिहासिक निर्णय! IPL खेळणाऱ्यांवर पैशांचा पाऊस; १ फ्रँचायझी १२.६० कोटी देणार
8
अरविंद केजरीवाल कधी मुख्यमंत्री निवासस्थान सोडणार? AAP कडून आली मोठी अपडेट
9
उल्हासनगरमधून शिंदेसेनेच्या राजेंद्र चौधरी यांनी थोपटले दंड; 'मराठी चेहरा' मतदारांना भावणार?
10
“लाडकी बहीण योजनेला स्वार्थी म्हणणे महिलांचा अपमान”; राज ठाकरेंना अजित पवार गटाचे उत्तर
11
"अपने साथी शहीदों में शामिल...", हिजबुल्लाहकडून नसरल्लाहच्या खात्म्याची पुष्टी; घेतली मोठी शपथ!
12
'लाडली बेबी योजना' आणणार, गर्भवती महिलांना दरमहा ५००० रुपये देणार, नैना चौटाला यांची घोषणा
13
कृषी पुरस्कारांचे उद्या राज्यपालांच्या हस्ते वितरण होणार, धनंजय मुंडेंची माहिती
14
“ठाकरे गटाला महाविकास आघाडीत फक्त ४४ जागा मिळतील”; प्रकाश आंबेडकरांचा मोठा दावा
15
Women's T20 World Cup : "भारत प्रबळ दावेदार असला तरी...", ऑस्ट्रेलियन खेळाडूचा Team India ला इशारा
16
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका कधी होणार? केंद्रीय आयोगाने पत्रकार परिषदेत दिलं उत्तर
17
आयडीएफनं खात्मा केलेला नसराल्लाह कोण होता? हिजबुल्लाह चीफ बनण्यापासून ते इस्रायलबद्दलच्या द्वेषाची कहाणी!
18
उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून १०१ पुजाऱ्यांच्या हस्ते महायज्ञ
19
“लाडकी बहीण नाही, लाडकी खुर्ची योजना, तिघे भाऊ लबाड आहेत”; ठाकरे गटाची खोचक टीका
20
Narendra Modi : "हा नवा भारत, घरात घुसून मारतो, आजच्याच रात्री सर्जिकल स्ट्राईक..."; मोदींचा काँग्रेसवर घणाघात

दुष्काळी भागात चिंतेच्या ढगात शेतकऱ्यांचा वावर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 11:08 PM

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस होत असल्याने पेरण्यांना उरक आला आहे. तर पूर्व दुष्काळी भागात आजही अनेक शेतकरी पेरणीस धजावले नाहीत. त्यामुळे जुलै संपत आलातरी जिल्ह्यातील पेरणी १०० टक्के झालेली नाही. आतापर्यंत ८३.१९ टक्के पेरणी झाली आहे. माण, खटावमध्ये निश्चित केलेल्या क्षेत्राच्या जवळपास पेरणी आली आहे. पूर्वेकडे पाऊस नसल्याने शेतकºयांत चिंतेचे ढग आहेत. तर जिल्ह्यात सर्वात अधिक पेरणी ही सोयाबीनचीच झाली आहे.जिल्ह्यात गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाचे आगमन झाले असून, पूर्व भागात ऊन पडत असताना पश्चिम भागात मात्र जोरदार पाऊस कोसळत आहे. माण तालुक्यात आतापर्यंत ११० तर कोयनानगर येथे ३३०० मिलीमीटर पाऊस पडला आहे. पूर्व भागात पावसाच्या दडीमुळे चिंता लागली असून, पश्चिम भागात पेरणी, भात लावणीच्या कामाला वेग आला आहे.पश्चिम भागात आनंदाचे वातावरण असून, भाताच्या लावणीला वेग आला आहे. भुईमूग, इतर कडधान्ये यांची पेरणी सुरू आहे. तर पूर्व भागात कशीबशी ८० टक्क्यांच्यावर पेरणी गेलेली आहे. जिल्ह्यात यावर्षी भाताचे सर्वसाधारण क्षेत्र ५०८०५ हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी २०९३० हेक्टरवर लागण झाली आहे. ही टक्केवारी ४१.२० टक्के इतकी आहे. ज्वारीचे क्षेत्र २६९४५ हेक्टर असून, २१४८१ क्षेत्रावर पेरणी झाली आहे. ज्वारीची ७९.७२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. बाजरीचे पीक प्रामुख्याने कोरेगाव, माण, खटाव, फलटण आणि खंडाळा तालुक्यात घेण्यात येते. ४९५३१ हेक्टरपैकी ४४३७५ हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झाली आहे. निश्चित केलेल्या क्षेत्रापैकी अद्यापही १० टक्के क्षेत्र बाजरीचे पेरणीविना पडून आहे. जिल्ह्यात मका क्षेत्राची ९७.९४ टक्के, नाचणी ४३.६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. तसेच इतर तृणधान्य, कडधान्यांची पेरणी सुरू असून, त्याचे प्रमाण ५० टक्क्यांवर आहे.पूर्व भागात अद्यापही म्हणावा तसा असा पाऊस झालेला नाही. त्यातच पावसाने दडी मारल्याने शेतकºयांत मात्र चिंतेचे ढग दाटून आले आहेत. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर खरीप हंगामातील पेरणी केली. त्यानंतर पिकांची उगवणही चांगली झाली. त्यामुळे आता पिकांना पाण्याची आवश्यकता आहे.सोयाबीन पेरणी १०० टक्क्यांवर; सूर्यफूल सर्वात कमीसोयाबीन पिकाचे क्षेत्र ५३७५० हेक्टर निश्चित करण्यात आले होते. त्यापैकी ५८७५० हेक्टरवर आतापर्यंत पेरणी झालेली आहे. हे प्रमाण १०८.५६ टक्के इतके आहे. सातारा आणि वाई तालुक्यात सर्वसाधारणक्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. तर जिल्ह्यात सूर्यफुलाची लागण सर्वात कमी झालेली आहे. ५८१ हेक्टरपैकी ८२ हेक्टरवरच लागण झालेली आहे. याची टक्केवारी १४.११ टक्के इतकीच आहे. मुगाचीही १५६.९३ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली असून, ती सर्वात अधिक आहे.