सातारा : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेश भक्तांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवानगी नसल्याचेही त्यांनी यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.आठवड्याभरात होणाऱ्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर व परिसरातील गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक गुरुवारी अलंकार हॉलमध्ये आयोजित करण्यात आली होती. यावेळी अधीक्षक समीर शेख बोलत होते.अधीक्षक शेख म्हणाले, बाप्पाच्या स्वागतासाठी सर्वजण इच्छुक असतात. त्या निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. आगमन व विसर्जन मिरवणूक वाजतगाजत काढली जाते. परंतु, यंदाच्या गणेशात्सव एका वेगळ्या वातावरणात आला आहे. संपूर्ण देशावर कोरोनाचे सावट आहे. जिल्ह्यामध्येही सध्या मोठ्याप्रमाणावर कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे समाजाच्या सुरक्षीततेसाठी यंदाच्या गणेशोत्सवासाठी शासनाने विविध नियम घातले आहेत.त्यानुसार सार्वजनिक मंडळांची गणेश मुर्ती चार तर, घरगुती मुर्ती दोन फुटापेक्षा कमी बसवावी. गणेश आगमन व विसर्जनावेळी मिरवणूकीला पूर्णत: बंदी आहे. मंडळामध्ये छोटा स्पिकर बसविण्यासाठीच केवळ परवाना देण्यात येणार आहे. जिल्ह्यामध्ये १४४ कलम लागू आहे. त्यामुळे मंडळामध्ये एकाच वेळी पाच पेक्षा जास्त कार्यकर्त्यांना थांबण्यासही बंदी आहे. त्यामुळे आरतीसह अन्य वेळी त्यापेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची काळजी घ्यावी.यावेळी शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, शाहूपुरी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शितोळे, शहर वाहतूक शाखेचे विठ्ठल शेलार तसेच शहरातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. आॅनलाईन अर्ज करण्याचे आवाहनगणेशोत्सव पवरानगीसाठी पोलिसांनी यंदा आॅनलाईन अर्जाची सोय उपलब्ध केली आहे. संपूर्ण अर्ज मराठीतून भरायचा आहे. त्यासाठी धमार्दाय आयुक्तांचा नोंदणी दाखला, नगरपालिका, ग्रामपंचायत, किंवा खासगी मालकाचे नाहरकत प्रमाणपत्र, वाहन विभागाचा नाहरकत दाखला, अधिकृत वायरमनचा लाईट टेस्टींग रिपोर्ट आवश्यक आहे.
गणेशोत्सवात यंदा देखाव्यांना परवानगी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2020 11:58 AM
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून गणेश भक्तांनी यंदाचा गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन सहायक पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले. मात्र, यंदा कोणत्याही प्रकारच्या देखाव्यांना परवानगी नसल्याचेही त्यांनी यावेळी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले.
ठळक मुद्देगणेशोत्सवात यंदा देखाव्यांना परवानगी नाहीगणेश मंडळांच्या बैठकीत समीर शेख यांनी दिली माहिती