शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शाळकरी मुलाचे अपहरण!

By admin | Published: July 07, 2014 11:01 PM

विहे घाटात मारहाण : रिक्षाचालकासह दोघांनी पळविल्याचा संशय

कऱ्हाड : शहरातील एका विद्यालयामध्ये नववीत शिक्षण घेणाऱ्या मुलाचे दोघांनी अपहरण केल्याचा प्रकार सोमवारी दुपारी उघडकीस आला. संबंधित मुलाला अपहरणकर्त्यांनी विहे घाटातील झाडीमध्ये नेले होते. मात्र, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटून तो मुलगा दुपारी कऱ्हाडातील आपल्या नातेवाइकांच्या घरी आल्याचे सांगितले जात आहे. संबंधित मुलाकडे पोलीस रात्री उशिरापर्यंत घटनेबाबत चौकशी करीत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कृष्णा नाका परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकाचा मुलगा सोमवारी सकाळी शाळेत जाण्यासाठी नाक्यावर आला. तेथे तो एका रिक्षामध्ये बसला. या रिक्षामध्ये चालकासह अन्य एक व्यक्ती होती. या व्यक्तींनी मुलाला शाळेकडे न नेता कऱ्हाड-पाटण मार्गाने विहे घाटात नेले. घाटामध्ये असलेल्या झाडीत नेऊन त्यांनी त्या मुलाला एका महिलेच्या ताब्यात दिले. मुलाला मारहाण करून त्याच्याकडे मोबाईल क्रमांकाची विचारणा करण्यात आली. त्यानंतर रिक्षाचालक व त्याच्यासोबत असलेली व्यक्ती तेथून निघुन गेली. बराच वेळ मुलगा महिलेच्या ताब्यात होता. काही वेळानंतर मुलाने त्या महिलेच्या डोक्यात दगड मारून तेथून पळ काढला. रस्त्यावर येऊन तो एका वाहनाने कऱ्हाडातील आपल्या नातेवाइकांकडे गेला. नातेवाइकांना ही घटना समजल्यानंतर त्यांनी मुलासह पोलीस ठाणे गाठले. पोलिसांना घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. मुलाकडून समजलेल्या घटनाक्रमानुसार पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत कोणतीही ठोस माहिती हाती लागली नव्हती. तसेच याबाबतचा गुन्हाही पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला नव्हता. (प्रतिनिधी)