सातारा : शिक्षण क्षेत्रामधील विविध प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ दि. ९ ते १० डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात लाक्षणिक शाळाबंद आंदोलन करणार असल्याची माहिती सातारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय यादव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मानसिंग नलावडे, अनिल माने, सुरेश रोकडे, एस.व्ही. कदम आदी उपस्थित होते. संजय यादव म्हणाले, ‘जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष संजय यादव यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या वतीने संपूर्ण राज्यभर विविध प्रकारच्या आंदोलनाचे टप्पे निश्चित करण्यात आलेले आहेत.या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यानुसार महाराष्ट्रातील सर्व शाळा दि. ९ व १० डिसेंबर रोजी बंद ठेवण्यात येणार आहेत. या शाळाबंद आंदोलनामध्ये सातारा जिल्ह्यातील सर्व संघटना सक्रीय सहभाग घेत आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा दि.९ व १० डिसेंबर रोजी बंद ठेवून या आंदोलनास जिल्ह्याच्या वतीने सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघ, सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ सातारा, शिक्षण परिषद, माध्यमिक शाळा कृती समिती, टी.डी. ए. संघटना, शारीरिक शिक्षक संघटना, कला शिक्षक संघटना, शिक्षकेत्तर संघटना, शाळा गं्रथपाल संघ या संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. (प्रतिनिधी)संघटनेच्या मागण्या :शासनाने २८ आॅगस्ट २०१५ चा संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा अहवाल मान्य करावाखासगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावीकला-क्रीडा शिक्षकांची पूर्णवेळ नियुक्ती करावीतसेच दि.७ आॅक्टोबर २०१५ चा शासन निर्णय रद्द करण्यात यावादि.१ नोव्हें.२००५ पूर्वी सेवेत असलेल्या व त्यानंतरही सेवेत आलेल्या अशा सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावीप्राथमिक शाळामध्ये लिपिक व सेवकांची पदे मान्य करून भरावीतशासनाने शालेय पोषण आहार यंत्रणा स्वतंत्र राबवावीशिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना शालाबाह्य कामे देऊ नयेतअनुदानास पात्र शाळा, कनिष्ठ महाविद्यालये व वर्ग तुकड्यांना अनुदान द्यावे.
जिल्ह्यातील शाळा उद्यापासून बंद
By admin | Published: December 07, 2015 10:12 PM