सातारा : शहरातील एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून, याप्रकरणी कोडोलीतील एका युवकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मोहम्मद शब्बीर शेख (रा. धनगरवाडी, कोडोली सातारा) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोहम्मद शेख हा पीडित मुलीकडे सातत्याने एकटक बघायचा तसेच रस्त्याने जात असताना तिला रस्त्यात अडवून ‘तू माझ्याशी पाच मिनिटे बोल,' असे म्हणत पाठलाग करत होता. ‘तू माझ्याशी बोलली नाहीस तर त्याचे परिणाम वाईट होतील. तुझ्या घरच्यांना सोडणार नाही,' अशी धमकीही तो देत होता. एके दिवशी तिच्या हाताला पकडून तिला एका चायनीज दुकानात ओढत नेले आणि तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे वर्तन केले. संबंधित शाळकरी मुलीने हा प्रकार घरातल्यांना सांगितला. त्यानंतर मोहम्मदवर गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, गुन्हा दाखल होताच मोहम्मद शेख हा फरार झाला असून, शहर पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलीस उपनिरीक्षक धनश्री भगत या अधिक तपास करत आहेत.