शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर; माहिम मतदारसंघात उतरवला उमेदवार
2
मनसेची ४५ जणांची दुसरी यादी जाहीर; अमित ठाकरे कोणत्या मतदारसंघात लढणार?
3
खडकवासला मतदारसंघात मनसेचा मोठा धमाका; सोनेरी आमदाराच्या सुपुत्राला उमेदवारी
4
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात आता चौथ्या आघाडीची घोषणा; प्रकाश आंबेडकरांना ऑफर
5
 "याचं उत्तर त्यांना द्यावं लागेल"; सुप्रिया सुळेंनी काढला नवा मुद्दा, अजित पवारांची कोंडी?
6
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेश पाटील यांना पक्षात घेण्यास रोहित पवारांचा विरोध, कारण...
7
मविआत मोठा भाऊ काँग्रेसच...! ठाकरे-पवार पहिल्यांदाच १०० पेक्षा कमी जागा लढवणार?
8
Vidhan Sabha Election 2024: तिसऱ्या आघाडीचा साताऱ्यातील आठ मतदारसंघाबद्दल मोठा निर्णय
9
मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा द्या; बंडखोरीच्या तयारीत असलेल्या समीर भुजबळांना अजितदादा-तटकरेंचा आदेश!
10
लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या विमानातून ४० कोटी आले; खैरेंच्या आरोपाने खळबळ
11
वक्फ सुधारणा विधेयकाच्या JPC बैठकीत राडा; खासदारानं काचेची बाटली फोडली, काय घडलं?
12
फॅन वाले बाबा की जय हो! शिखर धवन बनला 'पंखेवाले बाबा', गब्बर अन् 'लड्डू मुत्या' गाणं...
13
मविआत फूट? शेतकरी कामगार पक्षाने जाहीर केले ५ उमेदवार; जयंत पाटलांनी केली घोषणा
14
Maharashtra Vidhan Sabha 2024: अजित पवार 'या' मतदारसंघात 'शिरूर पॅटर्न' राबविणार का?
15
मुसळधार पावसाचा बंगळुरूमध्ये कहर, बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळली, मजूर अडकल्याची भीती
16
शिंदे समर्थक अपक्ष आमदार शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाणार, भाजपाला दिला होता पराभवाचा धक्का
17
कॅमेरा ऑन केला अन् पळून गेली...; 'या' Video ला मिळाले ३० मिलियन व्ह्यूज, लोक झाले हैराण
18
८-९ तासांच्या डेस्क जॉबमुळे आखडतेय कंबर, करा हे ५ व्यायाम, त्वरित मिळेल आराम
19
महाराष्ट्रात मविआत तणाव, तिकडे झारखंडमध्ये इंडिया आघाडीत फूट, हा पक्ष पडला बाहेर, उमेदवारही केले जाहीर
20
तुळजाभवानी मंदिर संस्थानचा लोगो मतदानातून निवडणार; मतप्रक्रिया सर्व भक्तांसाठी खुली

शाळांना यंदा १२८ दिवस सुट्टी

By प्रगती पाटील | Published: June 13, 2024 5:03 PM

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या आदेशानुसार माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार एकूण ७६ सुट्ट्या यंदा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत.

सातारा : सातारा जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शैक्षणिक वर्षातील सुट्ट्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यंदा विद्यार्थ्यांना १२८ दिवस सुट्ट्या असणार आहेत. यात उन्हाळी सुट्टी, दिवाळी सुट्टी, विविध सण उत्सव यासह रविवारचा समावेश आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या परिपत्रकानुसार शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक पुणे यांच्या आदेशानुसार माध्यमिक शाळा संहितेच्या नियमानुसार एकूण ७६ सुट्ट्या यंदा शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आल्या आहेत. उन्हाळी सुट्टी २ मे ते १४ जून अशी ४३ दिवसांची आहे. यात साप्ताहिक सुट्ट्या सहा आणि एक शासकीय सुट्टी दिवस असे एकूण ३६ दिवस सुट्टी विद्यार्थ्यांना मिळाली. २८ ऑक्टोबर ते ११ नोव्हेंबर अशी पंधरा दिवसांची विद्यार्थ्यांना दीपावली सुट्टी मिळणार आहे. यात २ रविवार आणि ३ शासकीय सुट्ट्यांचा समावेश आहे.

१. अशी आहे सुट्ट्यांची विभागणी उन्हाळी सुट्टी ३६ दिवस दीपावली सुट्टी १० दिवस सार्वजनिक सुट्ट्या २० दिवस जिल्हाधिकारी घोषित सुट्ट्या ३ दिवस शालेय सुट्ट्या ५ दिवसमुख्याध्यापकांच्या अधिकारातील सुट्टी २ दिवस

२. यासाठी मिळणार शाळांना सुट्ट्या बुद्ध पौर्णिमा, बकरी ईद, मोहरम, आषाढी एकादशी, स्वातंत्र्यदिन, पारशी नववर्ष दिन, गणेश चतुर्थी, ईद-ए-मिलाद, महात्मा गांधी जयंती, विजयादशमी, लक्ष्मीपूजन, दीपावली पाडवा, गुरुनानक जयंती, नाताळ, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, महाशिवरात्री, धुलीवंदन, रमजान ईद, महावीर जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, गुड फ्रायडे, महाराष्ट्र दिन .

प्रत्यक्ष कामाचे दिवस : २३७ दिवससुट्ट्या : ७६ दिवससाप्ताहिक सुट्ट्या : ५२ दिवस

सातारा जिल्ह्यातील शाळांना सुट्ट्यांचे नियोजन जाहीर करण्यात आले आहे. यात रक्षाबंधन, घटस्थापना, नरक चतुर्दशी या सुट्ट्या जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या आहेत. तर बेंदूर, गौरी पूजन, गौरी गणपती उत्सव, अनंत चतुर्दशी आणि मकर संक्रांति या पाच सुट्ट्या शाळांनी जाहीर केलेल्या आहेत. याबरोबरच मुख्याध्यापकांच्या अधिकारातील दोन सुट्ट्या ही शाळांना देण्यात आले आहेत.- प्रभावती कोळेकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी

टॅग्स :Schoolशाळा