शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
6
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
7
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
8
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
9
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
10
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
11
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
12
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
13
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
14
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
15
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
16
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
17
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
18
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
19
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
20
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला

व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून स्कॉर्पिओ पळवली, साताऱ्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2023 3:51 PM

पथके कोल्हापूर, सांगलीला रवाना...

सातारा : गाडी खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकाला पिस्तुलाचा धाक दाखवून चार लाखांची स्कॉर्पिओ पळवून नेल्याची धक्कादायक घटना दि. २१ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास साताऱ्यातील बाॅम्बे रेस्टाॅरंट चाैकात घडली. याप्रकरणी चारजणांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, नवनाथ नामदेव भुजबळ (३५, रा. चाकण, ता. खेड, जि. पुणे) यांचा गाड्या खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. सोशल मीडियावर गाडी विक्रीची जाहिरात पाहून एका व्यक्तीने त्यांच्याशी संपर्क साधला. स्कॉर्पिओ गाडीचा व्यवहार चार लाख दहा हजारांना ठरला. टोकन म्हणून त्या व्यक्तीने त्यांना दहा हजार रुपये पाठवले. उर्वरित पैसे तुम्ही साताऱ्यात गाडी घेऊन आल्यानंतर देतो, असे सांगितले. त्यानुसार भुजबळ हे दि. २१ रोजी रात्री साडेनऊ वाजता आपल्या तीन व्यावसायिक मित्रांसमवेत दोन गाड्या घेऊन साताऱ्यात आले. बाॅम्बे रेस्टाॅरंटजवळ हे सर्वजण त्यांना भेटले. गाडीची ट्रायल घेऊन येतो, असे सांगून त्यांनी गाडीची चावी घेतली. गाडीमध्ये भुजबळ यांचे दोन मित्र बसले. गाडी कोल्हापूरच्या दिशने ट्रायल घेण्यासाठी निघाली. गाडीचा वेग वाढवल्याने गाडीमध्ये बसलेल्या भुजबळ यांच्या मित्राला शंका आली. त्याने चालत्या गाडीतून उडी मारली, तर दुसरा व्यावसायिक मित्र गाडीतच बसला होता. त्याला पिस्तुलाचा धाक दाखवून गाडीतून खाली उतरवले. त्यानंतर गाडी कोल्हापूरच्या दिशेने सुसाट निघून गेली. या प्रकारानंतर व्यावसायिक नवनाथ भुजबळ यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.पथके कोल्हापूर, सांगलीला रवाना...पिस्तूलचा धाक दाखवून स्कॉर्पिओ कोल्हापूरकडे गेली आहे. त्यामुळे दरोडेखोरांना पकडण्यासाठी सातारा पोलिसांची दोन पथके सांगली आणि कोल्हापूरला रवाना झाली आहेत. संशयितांचा थांगपत्ता पोलिसांना लागला असून, लवकरच त्यांना बेड्या ठोकल्या जातील, असे अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस