कºहाड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे गुरुवारी (दि. १७) कºहाड दौºयावर येत आहेत. सातारा जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाºयांनाया बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्याअसून, या बैठकीत लोकसभा उमेदवारीची चाचपणी केली जाणार आहे.राज्यात व केंद्रातील सत्तेत एकत्रित असतानाही शिवसेना-भाजप नेत्यांमध्ये भलतेच वाकयुद्ध पेटले आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांइतकीच धारधार टीका शिवसेना नेत्यांकडून सुरू असली तरी राज्यातील भाजपनेते सेनेसोबतची युती टिकविण्यासाठी आग्रही राहिले. मात्र लातूर येथे झालेल्या सभेत भाजपचे पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी ‘पटक देंगे...’ असा इशारा शिवसेनाला दिला होता.
आता त्याचीच री...भाजपचे राज्यातील नेतेही ओढू लागले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सोलापुरात आगामी निवडणुकीत ‘जो आमच्यासोबत येईल, त्याला सोबत घेऊ आणिजो आमच्यासोबत नसेल उसको हम पटक देंगे,’ असा इशारा पुन्हा एकदा दिला.या पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना हे दोन्ही पक्ष एकत्र येतील, याची शाश्वती राहिलेली नाही. सातारा लोकसभा मतदारसंघाचा विचार केला तर राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांना गळाला लावण्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अनेक प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजेंच्या प्रेमाखातर मोठा निधी सातारा लोकसभा मतदारसंघात दिला. तसेच राजेंनी भाजपमध्ये यावे, असे आवतनही अनेकदा दिले. मात्र राजे काही हाती लागेनात, अशी स्थिती आहे.या परिस्थितीत भाजपने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी बुथ कमिट्यांची बांधणी करण्यात आली आहे. केंद्र व राज्यातील सरकारचे बळ भाजपच्या स्थानिक नेतेमंडळींना दिले जात आहे. खा. उदयनराजे भोसले भाजपमध्ये आले असते तर भाजपला निवडणूक सोपी झाली असती; परंतु त्यांचा अंदाज येत नसल्याने भाजपने स्वबळ आजमावण्यावर भर दिला आहे.गुरुवारी होणाºया बैठकीत पदाधिकाºयांकडून येणाºया सूचनाही रावसाहेब दानवे गांभीर्याने ऐकणार असून, आगामी निवडणुकीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ते कोणता कानमंत्र देतात, हे पाहण्याजोगे ठरणार आहे.मलकापूरचा धावता आढावामलकापूर पालिकेची पंचवार्षिक निवडणूक भलतीच रंगात आली आहे. राज्यात भाजप-शिवसेनेना नेत्यांचे विळा-भोपळ्याचे सख्य असले तरी मलकापुरात मात्र भाजप-शिवसेनेच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र आहे. या निवडणुकीत धावता आढावाही दानवे घेणार आहेत.
दमदार उमेदवाराचा शोधलोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षातून पुरुषोत्तम जाधव, विक्रम पावसकर यांची नावे चर्चेत आहेत. वाईचे माजी आमदार मदन भोसले यांना पक्षात घेऊन त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्यासाठीही भाजपचे नेते इच्छुक आहेत. आता या तीन नावांव्यतिरिक्त इतर कुणाचे नाव गुरुवारी होणाºया बैठकीतून पुढे येते, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.