शहरं
Join us  
Trending Stories
1
तेव्हा गृहखातं आमच्याकडेच ठेवलं असतं तर...; संजय राऊतांना आठवला फडणवीसांचा सल्ला
2
लाडक्या बहिणींना सहाव्या हप्त्याची प्रतीक्षा; २१०० रुपये कधी जमा होऊ शकतात? जाणून घ्या...
3
पहिल्याच पोस्टिंगवर रुजू होण्यासाठी निघालेले; आयपीएस अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
4
विजयानंतर चित्र बदलले, अजित पवार गटात पक्षप्रवेशासाठी रांग, या पराभूत उमेदवारांनी घेतली भेट
5
'मुलाची सर्व गुन्ह्यांमधून निर्दोष मुक्त केले' ट्रम्प यांनी बायडेन यांच्या निर्णयावर टीका केली; म्हणाले, 'अधिकारांचा गैरवापर केला'
6
"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण
7
विद्यार्थ्यांसाठी APAAR ID योजना राबविण्यास सुरुवात; आयुष्यभर उपयोगी ठरणार..., फायदा काय
8
या पाच प्रश्नांमुळे एकनाथ शिंदे चिंतीत, त्यामुळेच फडणवीस यांना मुख्यमंत्रिपद देण्यास घेताहेत आढेवेढे
9
IPL 2025 साठी 'KKR है तैयार'! अनसोल्ड टॅग लागलेला Ajinkya Rahane कॅप्टन्सीसाठी पहिली पसंती
10
Adani Green Energy Share: आरोपांनंतरही अदानींचा 'हा' शेअर सुस्साट; ४ दिवसांत ६०% वाढला स्टॉक; आजही मोठी तेजी
11
अवध ओझा राजकारणात करणार एन्ट्री! कोणत्या पक्षात प्रवेश करणार?
12
विधानसभेत मी मैदानात असतो आणि समीकरणं जुळली असती तर...; जरांगेंचा नव्या सरकारला इशारा
13
"त्यांनी मुख्यमंत्र्यांची सभा सुद्धा रद्द केली"; संजय गायकवाडांच्या आरोपांना केंद्रीय मंत्री जाधवांचं प्रत्युत्तर
14
Rajesh Power Services IPO : पहिल्याच दिवशी पैसा झाला दुप्पट; 'या' IPO नं केला १००% चा फायदा; कोणता आहे शेअर?
15
'तो' शब्द बोलणं अल्लू अर्जुनला पडलं महागात! 'पुष्पा 2' फेम अभिनेत्याविरोधात तक्रार दाखल; नेमकं प्रकरण काय?
16
२० जिल्ह्यातील शेतकरी दिल्लीकडे करणार कूच; चिल्ला बॉर्डरवर वाहतूक कोंडी, पोलीस अलर्ट
17
'पुष्पा २'साठी पुन्हा एकदा श्रेयस तळपदे बनला अल्लू अर्जुनचा आवाज, म्हणाला- "फ्लॉवर नहीं, फायर है मेंपासून..."
18
मुंबई-मँचेस्टर विमानाचे कुवैतमध्ये इमर्जन्सी लँडिंग; ६० भारतीय १३ तास अडकले
19
९५ चेंडूत ५ धावा खर्च करत ४ विकेट्स! या गोलंदाजानं उमेश यादवचा रेकॉर्ड मोडला, पण..
20
सत्तेच्या बाहेर राहण्याचा एकनाथ शिंदेंचा विचार, परंतु...; भरत गोगावलेंचं विधान

Satara: महाबळेश्वर गारठला, हंगामातील निचांकी तापमानाची नोंद; किती अंशावर आलं तापमान..जाणून घ्या

By नितीन काळेल | Published: November 29, 2024 7:12 PM

जनजीवनावर परिणाम: सातारा शहरात १२ अंशाची नोंद 

सातारा : जिल्ह्यातील किमान तापमानात आणखी उतार आला असून, शुक्रवारी महाबळेश्वरात १०.५, तर सातारा शहरात १२ अंशाची नोंद झाली आहे, हे या हंगामातील आतापर्यंतचे नीचांकी तापमान ठरले आहे. पारा खालावल्याने जिल्ह्यातील गारठ्यात चांगलीच वाढ झाल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे.जिल्ह्यात दरवर्षी डिसेंबर महिन्यात कडाक्याची थंडी पडते. साधारणपणे डिसेंबरचा मध्य ते जानेवारीची सुरुवात यादरम्यान पारा एकदम खाली येतो. पण, यंदा नोव्हेंबर महिन्यातच कडाक्याच्या थंडीला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मागील १५ दिवसांत थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यातच सध्या दररोज पारा घसरत चालला आहे. त्यामुळे चार दिवसांत किमान तापमानात दोन अंशाचा उतार आला आहे.सातारा शहरात थंडीचे प्रमाण वाढले आहे. गुरुवारी १२.५ अंश किमान तापमानाची नोंद झाली हाेती. पण, शुक्रवारी पहाटेच्या सुमारास शहरात १२ अंशाची नोंद झाली. त्यातच वातावरणात शीतलहर आहे. त्यामुळे अंगाला थंडी झोंबत असल्याचे चित्र आहे. त्याचबरोबर महाबळेश्वरचा पाराही घसरला आहे. शुक्रवारी १०.५ अंशाची नोंद झाली. हे या हंगामातील नीचांकी तापमान ठरले. आणखी दोन दिवस तापमानात उतार राहिला तर महाबळेश्वरात दवबिंदू गोठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.जिल्ह्याच्या अनेक भागातील किमान तापमान १३ अंशाच्या दरम्यान आहे. यामुळे थंडीत वाढ झाली आहे. सायंकाळी सहानंतरच थंडीला सुरुवात होते. रात्रभर थंडीची तीव्रता जाणवते, तर पहाटेच्या सुमारास थंडीचा कडाका पडत आहे. यामुळे सकाळी १०:०० वाजले तरी अंगातून थंडी जात नाही. तसेच दुपारच्या सुमारासही वाऱ्यामुळे थंडी जाणवते. या थंडीमुळे बाजारपेठ तसेच शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. थंडीमुळे गावोगावी आणि शहरातही शेकोट्या पेटविण्यात येत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानTemperatureतापमान