शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

विश्रांतीकडून ऋतूजा संकपाळ चितपट

By admin | Published: March 27, 2016 9:32 PM

शेणोलीत कुस्त्या : सत्तरहून अधिक लढती; शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले

कऱ्हाड : शेणोली, ता. कऱ्हाड येथे कलाई देवीच्या यात्रेनिमित्त झालेल्या निकाली कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाची संभाजी कळसे विरुद्ध सुदेश ठाकूर यांची कुस्ती बरोबरीत सुटल्याने शौकिनांची निराशा झाली. मात्र मैदानावर विश्रांती पाटील व दिशा कारंडे यांनी निकाली कुस्त्या केल्यामुळे उपस्थितांच्या डोळ्यांचे अक्षरक्ष: पारणे फिटले. कुस्त्या पाहण्यासाठी दिग्गज व पंचक्रोशीतील कुस्ती शौकिनांनी मैदान खचाखच भरले होते. पलूसचे तहसीलदार मधुसुदन बर्गे, मोटार वहान निरीक्षक चैतन्य कणसे, हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ, महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान धनाजी पाटील-आटकेकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. लहान गटामधील कुस्त्या संपल्यानंतर मैदानाचे आकर्षण असलेल्या महिला कुस्त्या पुकारण्यात आल्या. कोल्हापूरची विश्रांती पाटील विरुद्ध अहमदनगरची ऋतूजा संकपाळ यांच्यातील लढतीस प्रारंभ झाला. या कुस्तीमध्ये दोघींनीही आपआपली ताकद आजमावत डावपेच सुरू केले. एकमेकींवर पकड मिळवत असताना विश्रांतीने अचानक ऋतूजावर कब्जा घेत तिच्यावर एकेरी पटाच्या डावावर विजय मिळवला. तर पुणेतील उर्मिला पाटील विरुद्ध कोल्हापूरची दिशा कारंडे यांचीही लढत प्रेक्षकांना चांगलीच भावली. सुरुवातीला आक्रमक असणाऱ्या उर्मिलाला दिशाने काही क्षणातच लाटणं डावाच्या पकडीवर चितपट केले. या कुस्त्या पाहण्यासाठी मैदानात महिला प्रेक्षकांनीही हजेरी लावली होती. प्रेक्षणीय कुस्त्यांमध्ये आटकेतील संग्रामसिंह पाटील, शेणोलीतील अभिजित महाजन यांच्या निकाली कुस्त्या झाल्या. त्यानंतर मुख्य सहा कुस्त्यांच्या लढतींना प्रारंभ झाला. यामध्ये शेणोलीतील आकाश महाजन, रेठरे बुद्रुकचा सागर सावंत, कार्वेचा अजय थोरात, अंतवडीचा विनोद शिंदे, इंदोलीचा नयन निकम यांनी निकाली कुस्त्या करत उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. आकाश महाजनने अवघ्या दोन मिनिटांमध्ये बजरंग पाटलावर विजय मिळविल्यामुळे शौकिनांनी आकाशवर बक्षिसांची अक्षरक्ष: बरसात केली. समालोचन सुरेश जाधव यांनी केले. त्यांना प्रकाश कणसे, सुनील कणसे व तानाजी चवरे यांनी साथ दिली. (प्रतिनिधी)