वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला होता. हा विक्रम सलग दुसऱ्या वर्षी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी करून गाळप हंगामाचा उच्चांक निर्माण केला.चालू हंगामात उसाची उपलब्धता होती. मात्र, साखर उत्पादनात दुष्काळी परिस्थितीमुळे कमालीची घट झाली. यातच एफआरपी देण्याबाबत द्विधा मनस्थिती राहिल्याने हंगामाचा प्रारंभ उशिरा झाला. मात्र, दैनिक क्षमतेत वाढ झाल्यामुळे गतवर्षीच्या शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा उच्चांक जिल्ह्यातील १५ कारखान्यांनी मोडत ५ एप्रिलअखेर शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनात मजल मारली आहे.गतवर्षी एफआरपी एकदम न दिल्यामुळे अडचणीत सापडलेला न्यू फलटण शुगर्स वर्कस साखरवाडी हा कारखाना चालू हंगामात बंद राहिला तर याच हंगामात माण-खटाव हा नवीन साखर कारखाना चाचणी गाळप हंगामात कार्यरत झाला. या कारखान्यासह १४ कारखान्यांनी उच्चांकी गाळप करीत शंभर लाख क्विंटल साखर निर्मितीचा टप्पा पार केला.यामध्ये आजअखेर श्रीराम फलटणने ४ लाख ३९ हजार ६८ मेट्रिक टन गाळप करत ५ लाख ५ हजार २६० क्ंिवटल साखर उत्पादन केले. २६ मार्चअखेर गाळप बंद झाले. किसनवीर भुर्इंज कारखान्याने ५ लाख ७७ हजार ९५० लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ६ लाख २ हजार ३७० क्विंटल साखर उत्पादन घेतले. १६ मार्च रोजी हंगाचा शेवट केला. लो. बा. देसाई पाटण या कारखान्याने १ लाख ९६ हजार ३१५ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करीत २ लाख ३० हजार ५७५लाख क्विंटल साखर निर्मिती केली. हा कारखाना १९ मार्चपासून बंद झाला. रयत अथणी कारखान्याने २ लाख ९४ हजार १४० ला मेट्रिक टन गाळप करीत ३ लाख ७५ हजार ४८० क्विंटल साखर उत्पादन पूर्ण करीत १९ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. प्रतापगड कारखान्याने १ लाख ७५ हजार८१२ मेट्रिक टन ऊस गाळप करीत १ लाख ९१ हजार ८६० क्विंटल साखर उत्पादन करीत १५ मार्च रोजी गाळप हंगामाचा समारोप केला. जरंडेश्वर शुगरने १० लाख ०२ हजार ६९३ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण करीत १२ लाख ६४ हजार ५८० क्विंटल साखर उत्पादन घेतले.हा कारखाना १९ मार्च रोजी बंद झाला. ग्रीन पॉवर शुगर गोपूज कारखान्याने ४ लाख ४४ हजार ५६६ मेट्रिक टन उसाचे गाळप क रीत ५ लाख १८ हजार ५०० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखाना ७ मार्चपासून बंद झाला. स्वराज फलटणने ६ लाख ३८ हजार २१३ मेट्रिक टन उसाचे गाळपत पूर्ण करीत ६ लाख १९ हजार ३६० मेट्रिक टन क्विंटल साखर उत्पादन घेतले. १४ मार्च रोजी शेवट झाला. शरयू अॅग्रोने ७ लाख ८५ हजार ४२४ मेट्रिक टन उसाचे गाळप करीत ९ लाख ३५ हजार ४५० क्ंिवटल साखर उत्पादन घेतले. हा कारखान्याने १६ मार्च रोजी गाळप हंगामाचा समोराप केला.जिल्ह्यातील चार कारखाने अद्याप सुरूचजिल्ह्यातील एकूण नऊ सहकारी व सहा खासगी अशा पंधरा कारखान्यांपैकी दहा कारखाने उसाअभावी बंद झाले आहेत. कृष्णा, सह्याद्री अजिंक्यतारा, जयवंत शुगर्स व खटाव-माण या कारखान्यांचा गाळप हंगाम अद्याप सुरू आहे. एप्रिलअखेर कारखाने बंद होतील, अशी महिती कारखानदारांनी दिली आहे.
दुसऱ्या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 10:58 PM