सातारा : शहरालगत मेढा रस्त्यावरील जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत तब्बल ३९ लाखांच्या आसपास असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, या कारवाईत एकंदर ५५ जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. सैदापूर (ता. सातारा) ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्वामी विवेकानंदनगर वसाहतीत असणाऱ्या चारमजली इमारतीवर छापा टाकून पोलिसांनी रविवारी प्रतिष्ठितांच्या जुगार अड्ड्याचा पर्दाफाश केला होता. रात्री उशिरापर्यंत या अड्ड्यावर सापडलेल्या मुद्देमालाची नोंद आणि मोजदाद सुरू होती. पंचनामे केले जात होते. या मुद्देमालाची एकूण किंमत ३८ लाख ६५ हजार १२५ इतकी आहे. यात ६ लाख ५८ हजारांची रोकडच आहे. याव्यतिरिक्त या जुगार अड्ड्यावर ‘तीनपत्ती’ खेळण्यासाठी आलेल्यांच्या १३ दुचाकी आणि पाच चारचाकी गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. त्यांची किंमत २० लाख ५० हजार रुपये आहे. जुगारासाठीचे आणि अन्य साहित्य २ लाख ५८ हजार रुपयांचे आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रतिष्ठित व्यवसायातील अनेकांचा समावेश आहे. तीनपत्तीचा डाव टाकून जुगाराच्या माध्यमातून झटपट माया कमावू पाहणाऱ्यांमध्ये शिक्षक, प्राध्यापक, व्यापाऱ्यांबरोबरच सरपंच आणि मानवाधिकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे उघड झाले आहे. शहरानजीक सैदापूर हद्दीत पोलिसांनी आलिशान अड्ड्यावर टाकलेल्या छाप्यात रविवारी एकंदर ५५ जणांना अटक करण्यात आली असून, त्यातील अनेकजण बाहेरगावचे आहेत. जुगार खेळण्यासाठी ना वयाची अट, ना सांपत्तिक स्थितीची, ना व्यवसायाची. सारेच एकत्रितपणे पत्ते कुटून झटपट पैसा कमावण्याचा राजमार्ग शोधणारे. सैदापुरातील अड्ड्यावर पकडण्यात आलेल्या व्यक्तींच्या यादीवर नजर टाकली असता हेच दिसून येत आहे. यापैकी सर्वांत तरुण व्यक्ती २० वर्षांची तर सर्वांत ज्येष्ठ व्यक्ती ६४ वर्षांची असल्याचे आढळले आहे. ‘मुंबई जुगार अॅक्ट’अन्वये या ५५ जणांना रविवारी अटक करण्यात आली होती. ‘यशवंत स्पोर्टस अँड चॅरिटेबल ट्रस्ट’ या संस्थेच्या नावाखाली पैसे लावून ‘तीनपत्ती’ सुरू असल्याचे पोलिसांना आढळून आले. त्यामुळेच छाप्याच्या वेळी अड्ड्यावर तब्बल ६ लाख ५८ हजार १२५ रुपयांची केवळ रोकडच आढळली. हा ट्रस्ट चक्क नोंदणीकृत होता, अशीही माहिती पोलिसांनी दिली. ज्या इमारतीत हे प्रकार सुरू होते, ती पोलिसांनी ‘सील’ केली आहे. या अड्ड्यावर पुणे तसेच पुणे-सातारा रस्त्यावरील गावांमधील लोकांची ये-जा मोठ्या संख्येने होती, हे छाप्यातून समोर आले आहे. पकडलेल्यांमध्ये बिबवेवाडी, गंज पेठ, वारजे-माळवाडी, बालाजीनगर, हडपसर, कात्रज अशा पुणे शहर आणि परिसरातील व्यक्तींचा समावेश असून, पुणे जिल्ह्यातील तळेगाव, भोर परिसरातील व्यक्तीही ‘तीनपत्ती’साठी साताऱ्यापर्यंत येत होत्या, हे स्पष्ट झाले आहे. काही जण कागल (जि. कोल्हापूर), कुडची (ता. रायबाग जि. बेळगाव) अशा दूरवरच्या गावांमधून आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे या अड्ड्यावरील फलकावर लिहिल्याप्रमाणे सर्वकाही ‘मनोरंजना’साठीच चालले होते, असे म्हणण्याचे धाडस अद्याप कुणी केलेले नाही. सातारा शहरासह तालुक्यातील महादरे, करंजे, मालगाव, जावली तालुक्यातील मेढा, कोरेगाव शहर तसेच तालुक्यातील ल्हासुर्णे, खटाव, वडूज, महाबळेश्वर, खंडाळा तालुक्यातील शिरवळ असे जिल्ह्यातील ठिकठिकाणचे लोक या अड्ड्यावर आढळून आले आहेत. (प्रतिनिधी) कारवाईचा आवाका मोठा घटनास्थळी सापडलेली रोकड, साहित्य आणि मोटारी, दुचाक्या तसेच दूरवरून ‘मनोरंजना’साठी आलेले लोक पाहता रविवारच्या कारवाईचा आवाका लक्षात येतो. पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर यांनी शाहूपुरीमध्ये एक जुगार अड्डा उद््ध्वस्त केल्यानंतर दोनच दिवसांनी ही कारवाई झाली. या कारवाईत तालुका पोलीस ठाणे, शाहूपुरी पोलीस ठाणे, नियंत्रण कक्ष, तसेच वाहतूक पोलिसांचेही पथक सहभागी झाले होते. ५कारवाईत अटक झालेल्यांची नावे आनंद दामोदर सणस, प्रवीण मारुती खणकर, राजेंद्र माधव पुरोहित, दिलीप ज्ञानोबा गुंजवटे, प्रदीप काशिनाथ पंडित, सैदुद्दिन हमीददिन रोहिले, मदन बंडू घोडके, आनंद बापुराव वासुतकर, मनोज पमाजी वायदंडे, अर्जुन मुरलीधर मलाजी, प्रेमनाथ रामा माने, दत्तात्रय ज्ञानोबा शिळीमकर, राजेंद्र रामचंद्र पवार, कपिल रामस्वरूप अगरवाल, रवींद्र राजाराम पाटेकर, अनिल लक्ष्मण पाटेकर, सतीश दादा जाधव, दिलीप बाबुराव वाडकर, राजेंद्र ज्ञानू सावंत, संतोष चंद्रकांत वाराघडे, रतन काशिनाथ राठोड, अमोल विलास भोसले, अली अहमद उस्मान शेख, हणमंत लक्ष्मण फडतरे, जनार्दन रामचंद्र शिंदे, राज्या रामू दगडू, उमाकांत शामराव धसके, दादासाहेब दगडू पवार, संजय पांडुरंग माने, सुनील विश्वास आवळे, अनिस शमसुद्दिन खान, प्रवीण महादेव राऊत, रामराव तुकाराम लाडोळे, अब्दुल महमूद पठाण, दशरथ रामचंद्र घोडके, शब्बीर गफारखान पठाण, रणधीर अरुण मदने, विक्रम अशोक बोराटे, बजरंग हिंदुराव मोहिते, फिरोज रमजान पटेल, नंदकिशोर बळवंत साळुंखे, ज्ञानेश्वर सुबराव लोंढे, आनंद तानाजी बर्गे, सुधीर बिंदेश्वर राऊत, विजय दत्तात्रय पडवळ, ताजुद्दिन अल्लाबक्ष पन्हाळकर, युवराज गुराप्पा सेलूकर, गोपाळ श्रीवल्लभ धूत, अंशुमन ऊर्फ रूपेश तुकाराम साबळे, सुधीर दिलीप सिंग, राजू इकबाल शेख, रसंदीप गंगाराम काटकर, सुनील अनंत बडेकर, अनिल जनार्दन चौधरी, संतोष बबन किर्दत.
सैदापुरातील मुद्देमाल ३९ लाखांचा!
By admin | Published: March 30, 2015 10:53 PM