सातारा : लहान मुले अवखळ असतात. अल्लडपणा त्यांच्यात पुरेपूर असतो. त्यामुळे लहान मुले कधी काय बोलतील व त्यांच्या तोंडून केव्हा काय शब्द येईल, हेही सांगता येत नाही. अशाचप्रकारचा एक किस्सा घडला आहे. कोरोनामुळे शिक्षक विद्यार्थ्यांचे ऑनलाईन क्लास घेत आहेत. पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतलेल्या एका लहानग्याला ऑनलाईन क्लास करणे माहीत नव्हते. प्रथमच तो मोबाईलवरून शिक्षकांचे बोलणे ऐकत होता तर शिक्षक विद्यार्थ्यांची माहिती घेत होते. याचवेळी एका घरातील मुलगा या ऑनलाईन क्लासला वैतागला. त्यामुळे त्याने घरातील आई-वडिलांना आवाज देऊन जवळ बोलावून घेतले आणि सांगितले. ‘मम्मी, पप्पा या मिटींगने मी बोअर झालोय. माझं डोकं गरम झालं बघा’, असे म्हणून त्याने आईचा हात धरून स्वतःच्या डोक्याला लावला. त्यावेळी मुलाचा हा प्रकार बघून घरातील सर्वजण हशात न्हाले.
........