गायकवाड यांची निवड सातारा : दहिवडी कॉलेजमधील भूगोल विभागप्रमुख डॉ. विजय गायकवाड यांना शिवाजी विद्यापीठाने एम.फिल. व पी.एचडी. पदवीचे संशोधन मार्गदर्शक म्हणून मान्यता दिली आहे. इंडियन सोशल सायन्स रिसर्च संस्थेच्या प्रकल्पावर डॉ. गायकवाड यांचे संशोधन सुरू आहे.
--------
अभिषेक शिंदेचे यश
सातारा : इंडियन नेव्हीमध्ये ‘एसएसआर’ या पदावर जावळी तालुक्यातील हुमगावच्या अभिषेक शिंदे याची निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे.
--------
गुरव यांना पुरस्कार
सातारा : वडूज येथील रहिवासी व तुपेवाडी, ता. खटाव येथील जिल्हा परिषद शाळेतील उपशिक्षिका आराधना गुरव यांच्या काव्यसंग्रहास इचलकरंजी येथील गंगाधर साहित्य परिषदेचा साहित्य भूषण पुरस्कार मिळाला आहे. या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
०००००
शालेय साहित्य वाटप
सातारा : जावळी तालुक्यातील ५९ शाळांमधील सुमारे एक हजार ७९८ विद्यार्थ्यांना राधाकृपा आश्रमाच्या ब्रजांचल चॅरिटेबल ट्रस्ट भोसे, मुंबई यांच्या वतीने शाळेला उपयोगी साहित्य व खाऊ देण्यात आला. कोरोनामुळे दरवर्षीप्रमाणे प्रत्यक्ष वाटप न करता सर्व शाळांना साहित्य पोहोचविण्यात आले.
००००००००००
खाडे यांना सत्कार
सातारा : माण तालुका प्राथमिक शिक्षक संघातर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रानमळा येथील उपक्रमशील शिक्षिका वैशाली खाडे यांचा सत्कार नगरसेविका साधना गुंडगे यांच्या हस्ते करण्यात आला.