पिंपोडे बुद्रुक : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या सातारा जिल्हा अध्यक्षपदी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती मंगेश धुमाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय सरचिटणीस कैलास गोरे यांनी नुकतेच धुमाळ यांना नियुक्तीचे पत्र दिले.
जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सदस्य यांच्या विविध रास्त मागण्या, कामकाजातील अडचणी व आढळून येणाऱ्या त्रुटी यावर संघटनात्मक पातळीवर चर्चा करून, या सर्व बाबी शासनाच्या पटलावर ठेऊन त्या सोडविण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या या सर्व लोकप्रतिनिधींना एकत्रित आणि सांघिक स्वरूपात काम करण्यासाठी या असोसिएशनचे व्यासपीठ उपयुक्त ठरेल, असा विश्वास सभापती मंगेश धुमाळ यांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, या नियुक्तीबद्दल सभापती मंगेश धुमाळ यांचे पालकमंत्री, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, अधिकाऱ्यांनी कौतुक केले.
हाफ फोटो : मंगेश धुमाळ
.........................................................