सातारा : पोलंड देशातील ६१व्या प्रतिष्ठाप्राप्त कॅक्रो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात परीक्षण करण्याची संधी चित्रपट दिग्दर्शक-निमार्ते राजभूषण सहस्त्रबुद्धे यांना मिळाली आहे. ही निवड फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल सिने क्लब यांच्याकडून करण्यात आली.
या महोत्सवात संपूर्ण विश्वातून केवळ तीन परीक्षक निवडण्यात आलेले असून, यामध्ये सहस्त्रबुद्धे भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. साताऱ्यातील अनुभव फिल्म क्लबचे ते सचिव असून, अनेक माहितीपट आणि लघुपटांचे दिग्दर्शन- निर्मिती त्यांनी केलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक नामांकित हिंदी-मराठी चित्रपटांत त्यांनी काम केले असून, सध्या काही मराठी मालिकांमध्ये ते अभिनेता म्हणून कार्यरत आहेत.
त्यांच्या निवडीबाबत फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीचे नांदगावकर, अमिताव घोष, अनुभव फिल्म क्लबचे अध्यक्ष शिरीष चिटणीस, उपाध्यक्ष अॅड. गिरीश कुलकर्णी, सहसचिव अॅड. अमित द्रविड, कोषाध्यक्ष मकरंद जोशी आदी मान्यवरांनी त्यांचे कौतुक केले.