वाई : व्याजवाडी (ता. वाई) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्वाती राजेंद्र कुदळे यांची तर उपसरपंचपदी संतोष यादवराव पिसाळ यांची निवड करण्यात आली.
गेली अनेक वर्षे काँग्रेस आणि सध्या भाजपच्या ताब्यात असलेली व्याजवाडी ग्रामपंचायत ताब्यात यावी म्हणून राष्ट्रवादी अनेक वर्षे प्रयत्नशील होती. बाजार समितीचे सभापती लक्ष्मणराव पिसाळ, अरविंद कुदळे यांनी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता यावी म्हणून केलेल्या प्रयत्नांना या निवडणुकीत यश आले. ९ पैकी ७ जागांवर राष्ट्रवादी विजयी झाली असून भाजपला या निवडणुकीत करिष्मा दाखवता आला नाही.
सरपंच निवडीसाठी नवनिर्वाचित सदस्यांची विशेष सर्वसाधारण सभा ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी तथा विस्तार अधिकारी राहुल हजारे यांनी काम पाहिले त्यांना ग्रामसेवक सुधीर जाधव यांनी सहकार्य केले. या वेळी सरपंच पदी स्वाती कुदळे यांची तर उपसरपंचपदी संतोष पिसाळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे खासदार श्रीनिवास पाटील, आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, नितीन पाटील, दिलीपराव पिसाळ, लक्ष्मणराव पिसाळ, शारदा ननावरे, शिवाजी पिसाळ, मोहन जाधव, सभापती संगीता चव्हाण, उपसभापती विक्रांत डोंगरे, उत्तमराव भोसले, दिनकर पिसाळ, महादेव चव्हाण, अशोक पिसाळ, संजय कुदळे, अरुण शेगडे, धर्मपाल मिसाळ यांच्यासह व्याजवाडी, मालुसरेवाडी, घेऱ्याचीवाडी ग्रामस्थांनी अभिनंदन केले.
फोटो : आयकार्ड
०२ स्वाती कुदळे
०२ संतोष पिसाळ