शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

भारत हवामान विभागात आत्मनिर्भर - केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू 

By दीपक शिंदे | Published: October 05, 2023 7:33 PM

महाबळेश्वरमधील ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी

महाबळेश्वर : ‘हवामान संशोधन क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीय शास्त्रज्ञांनी अलीकडच्या काळात उत्कृष्ट कामगिरी करून चांगले यश मिळविले आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीच्या जोरावर हवामान विभागात भारत आत्मनिर्भर झाला आहे. शास्त्रज्ञांनी केलेल्या या कामगिरीचे जगभरात कौतुक केले जात आहे,’ अशी माहिती केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.महाबळेश्वर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शास्त्रज्ञ डॉ. जी. पंडीथूरल उपस्थित होते. केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्री किरेन रिजिजू हे दोनदिवसीय सातारा जिल्हा दौऱ्यावर आले असून, गुरुवारी त्यांनी महाबळेश्वर येथील हवामान विभागाच्या ढग संशोधन केंद्रास भेट देऊन पाहणी केली.मंत्री रिजिजू म्हणाले, ‘शास्त्रज्ञांनी हवामान संशोधनात केलेल्या कामामुळे देशातील मच्छिमार व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होताना दिसत आहे. पूर्वी ढगांच्या संशोधनासाठी विमानाची मदत घ्यावी लागत होती. परंतु, महाबळेश्वरला मिळालेल्या नैसर्गिक उंचीमुळे येथे ढग संशोधन केंद्राची उभारणी करण्यात आली. त्यासाठी आता विमानाची मदत घ्यावी लागत नाही. ढगफुटी, महापूर व दरड कोसळून होणाऱ्या आपत्तीची माहिती अगोदर मिळविण्यात अपयश येत आहे. भविष्यात या संदर्भात अधिकचे संशोधन करण्याची गरज आहे.महाबळेश्वरला नैसर्गिक सुंदर असे दृष्टी सौंदर्य लाभले आहे. महाबळेश्वरला भेट देऊन चांगले वाटले.लहानपणापासूनच महाबळेश्वरला यायची इच्छा होती. ‘अनुपमा’ नावाच्या जुन्या चित्रपटांमध्ये महाबळेश्वरच्या दऱ्याखोऱ्या सुंदररीत्या चित्रीत करण्यात आल्या आहेत. माझ्यासोबत अभिनेते धर्मेंद्र लोकसभेमध्ये होते. तेव्हा या चित्रपटाचे चित्रीकरण कुठे झाले? असे विचारले असता त्यांनी महाबळेश्वर सांगितले होते. महाबळेश्वर हे आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ म्हणून उदयास येण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. आंतरराष्ट्रीय परिषदा, चांगले कार्यक्रमांचे आयोजन येथे केले पाहिजे. देशातील अनेक पर्यटक देशाबाहेर पर्यटनास जातात; मात्र आपल्या देशातच अनेक सुंदर पर्यटनस्थळे असूनही प्रसिद्धीअभावी लोकांना याची माहिती मिळत नाही. या ठिकाणी येथे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यासाठी प्रयत्न करू.’

महाबळेश्वमधील विविध पॉईंटला भेटकेंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी पहाटे महाबळेश्वरचे वैभव असलेले सूर्योदय, सूर्यास्तासाठी प्रसिद्ध विल्सन पॉइंटसह श्री क्षेत्र महाबळेश्वर मंदिर, तसेच केट्स पॉइंटला भेट दिली. विविध रंगी फुलांची माहिती, तसेच या प्रेक्षणीय स्थळांवरील निसर्गसौंदर्याची अनुभूती घेतली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानweatherहवामान