जावेद खानसातारा : येथील मध्यवर्ती बसस्थानकात अनधिकृ त फेरीवाल्याकडून निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांची राजरोसपणे विक्री केली जात आहे. ही बाब परिवहनच्या संबंधित अधिकाऱ्यांना सांगूनदेखील याकडे दुर्लक्ष केले जात आहे. एसटीचे काही कर्मचारी चिरिमिरीसाठी येथे येणाऱ्यां हजारो प्रवाशांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप काही प्रवाशांनी बोलून दाखविला आहे.सातारा एसटी महामंडळाकडून ३५ फेरीवाल्यांना बसस्थानकात खाद्यपदार्थ विक्रीचे परवाने देण्यात आले आहेत. तरीदेखील या ठिकाणी ८० हून अधिक फेरीवाले बसस्थानकात येणाऱ्यां प्रत्येक एसटीच्या मागे पळताना दिसतात. या फेरीवाल्यांकडून हातगाड्यावरील वडापावची विक्री केली जात आहे.परवानाधारक फेरीवाल्यांच्या दुपटीने या फेरीवाल्यांनी बसस्थानकात आपला जम बसविला आहे. असे असूनदेखील अधिकारीवर्ग कोणतीच कार्यवाही करत नसल्याने या विक्रेत्यांवर अधिकाऱ्यांची कृपा आसावी, असा आरोपदेखील केला जात आहे.फेरीवाल्यांना परवाने देताना काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार फेरीवाल्यांना एसटी बसमध्ये प्रवेश करून कोणत्याही पदार्थाची विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. परंतु अनधिकृत फेरीवाले थेट बसमध्ये चढून पदार्थांची विक्री करताना दिसून येत आहे.
परवाना एकाचा.. फेरीवाला दुसराच
बेरोजगाराच्या नावाखाली अनेकांनी फेरीवाल्याचे परवाने घेतले आहेत. यातील अनेकांनी हे परवाने चक्क भाड्याने दिले आहेत. एका परवाण्यावर पाच ते सहा फेरीवाले खाकी वस्त्र परिधान करून बसस्थानकात खाद्यपदार्थांची विक्री करत आहे. त्यामुळे परवानाधारक मालामाल झाले आहे.
बसस्थानकातील बहुतांश फेरीवाल्यांच्या अंगावर खाकी पोषाख असतो. त्यामुळे यातील अनधिकृत कोण आणि परवानाधारक कोण काहीच कळत नाही. प्रवाशांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी परवानाधारक फेरीवाल्यांना ओळखपत्र देणे अत्यंत गरजेचे आहे.- विकास पवार,प्रवासी
अनधिकृत फेरीवाल्यांवर चाप बसावा, यासाठी काहींचे परवाने रद्द करण्यातआले होते. पुन्हा हाच प्रकार होत असेल तर स्थानक प्रमुखांकडून याफेरीवाल्यांच्या परवान्याची तपासणी केली जाईल. यात कोणी दोषी आढळल्याससंबंधितांवर कारवाई केली जाईल.- गणेश कोळी, आगार व्यवस्थापक