सातारा : शाळा सुरू होऊ लागल्या आहेत. या परिस्थितीत मुलांसाठी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. मुलांची प्रतिकारशक्ती बळकट नसल्याने या व्हायरला ते बळी पडू शकतात. परिणामी पालकांनी मुळांना शाळेत पाठविण्याबाबतच सावध पावले उचलली आहेत. कोरोनापासून बचावासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायर यांचा वापर अनिवार्य वापर करण्याच्या सूचना वारंवार मुलांना दिल्या जात आहेत.
मुलांच्या बॅगेत याचेही ओझे वाढले
सॅनिटायझर : पाण्याच्या बाटलीसह शाळेसाठी बाहेर पडताना सॅनिटायझरही बंधनकारक
एक मास्क तोंडाला दुसरा बॅगेत
डबा शेअरिंग बंद
लहान मुलांना डबा दिला तरीही तो एकत्र खाण्यावर मर्यादा असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपला डबा स्वत:च संपविणे अपेक्षित असल्याच्या सूचना दिल्या आहेत.
सर्दी, डोकेदुखी तर शाळेला बुट्टी
सर्दी, डोकेदुखी हे रोगप्रतिकारशक्ती कमी झाल्याचे लक्षण आहे. त्यामुळे यापैकी कशाचाही त्रास होत असेल मुलांना शाळेत न पाठविणे सर्वांच्याच हिताचे ठरेल.
प्रतिकारशक्ती वाढावी म्हणून
रोगप्रतिकारकशक्तीसाठी महत्त्वाचे असलेले क, ड, अ, ई ही जीवनसत्त्वे
दिवसातून एकदा प्राणायाम हवाच
मुलांनी किमान आठ तास झोप घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यासाठी मुलांनी पुरेसं पाणी प्यायला हवं, असे तज्ज्ञांचे मत आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळा : २ हजार ७४१
खाजगी : २८३
विद्यार्थी : १ लाख २६ हजार ४२७