लोकमत न्यूज नेटवर्कवाठार निंबाळकर : वादळी वाऱ्यासह वळीवाच्या पावसाने फलटण तालुक्यातील ढवळ व वाखरीत बुधवारी रात्री थैमान घातले. यामध्ये अनेक घरांवरे पत्रे, कौले उडून गेले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने तसेच इतर झाडे व पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. ढवळमध्ये बाभळीचे झाड उन्मळून ट्रॅक्टर पडले. यामध्ये ट्रॅक्टरचे मोठे नुकसान झाले. ढवळ येथील मारुती धोंडीबा बनकर कौले उडून घराचे पाच हजार रुपयांचे नुकसान, संजय तात्याबा बनकर यांच्या घराची कौले उडून गेल्याने सहा हजार रुपयांचे नुकसान झाले. संपत धोंडिबा बनकर यांचे कौले उडून घराचे सहा हजार रुपये, उदयसिंह आनंदराव बनकर यांचे घराचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.हणमंत जिजाबा बनकर यांचे घराचे पाच हजार रुपये, बाळू बाबूराव बनकर घर व गोठ्याचे पाच हजार रुपयांचे नुकसान, बाळू रंगोबा बनकर यांचे कौलाचे घर, गोठा यांचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले.सावता शिवा बनकर यांचे घर व शेडचे मिळून पाच हजार, महेंद्र जगन्नाथ मोरे यांच्या घराचे घराचे तीन हजार, उदयसिंह जगन्नाथ मोरे यांच्या घरांचे चार हजार, हणमंत बुवा गायकवाड यांच्या शेडचे पाच हजार रुपयांचे नुकसान झाले. या नुकसानीतून पिकेही सुटलेली नाही. यामध्ये काशिनाथ ढेकळे यांच्या ऊसाचे पंधरा हजार रुपये, जयश्री ढेकळे यांच्या डाळींब पिकांचे पन्नास हजार रुपये, ज्ञानेश्वर हणमंत, दत्तात्रय बिचुकले यांच्या घर-छप्पर व ऊसाचे दोन लाख रुपये, आप्पा ढेकळे यांचे कडवळ पिकाचे वीस हजार रुपये, तुकाराम गरड यांच्या डाळींब पिकाचे नव्वद हजार रुपयांचे नुकसान झाले.जोतिराम कदम यांचे शेळीच्या गोठ्याचे पंचवीस हजार रुपये, विनायक गरड पाण्याच्या टाकीचे चार हजार, राजेंद्र गायकवाड यांच्या ऊसाचे एक लाख रुपयाचे नुकसान, जनाबाई गायकवाड यांच्या कडवळ व मका पिकाचे पंधरा हजार रुपयेचे नुकसान, महादेव मोहिते यांच्या ऊस पिकाचे पन्नास हजार रुपये, पुनम मोहिते यांच्या ऊस पिकाचे पन्नास हजार रुपये, तुकाराम मोहिते यांच्या ऊस व कडवळ पिकांचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले. यशोदा जाधव यांच्या कडवळ व मका पिकाचे वीस हजार रुपये, मारुती मोहिते यांच्या ऊस पिकाचे पन्नास हजार रुपये, सविता मोहिते यांच्या ऊस पिकाचे पंचवीस हजार रुपये, मंगल मोहिते यांच्या ऊसाचे पंचवीस हजार रुपये, बाळु धोंगडे यांच्या गोठ्याचे ३० हजार रुपयेचे नुकसान झाले. बबन गरड यांच्या कडवळ, मका पिकाचे पाच हजार रुपये, गौतम गायकवाड यांच्या ऊसाचे पंचवीस हजार रुपये, बाळू गायकवाड यांच्या ऊसाचे पंचवीस हजार रुपये, राजेंद्र ढेकळे यांच्या ऊस व कडवळ पिकाचे साठ हजार रुपये, मानसिंग ढेकळे यांच्या ऊस पिकाचे पन्नास हजार, महादेव ढेकळे यांच्या घराचे पंचवीस हजार, नवनाथ ढेकळे यांच्या ऊसाच्या पिकाचे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. शामराव ढेकळे यांच्या ऊस पिकाचे ७५ हजार रुपयांचे नुकसान आहे.
सैराट वादळाने झाडे जमीनदोस्त
By admin | Published: May 26, 2017 11:01 PM