खंडाळा : ‘फुले दाम्पत्यांचा आदर्श आचरणात आणणे गरजेचे आहे. सामाजिक परिस्थितीशी संघर्ष करून त्यांनी केलेले काम आणि विचार आज प्रेरणादायी आहेत. विशेषत: सावित्रीबार्इंची प्रेरणा जागृत ठेवण्यासाठी नायगाव येथे महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभे करण्यात यावे.’ असे मत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.आद्यस्त्री समाजसुधारक व स्त्री शिक्षणाच्या जनक ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती व भारतीय स्त्री मुक्ती दिन नायगाव येथे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री प्रा. राम शिंदे, दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, पालकमंत्री विजय शिवतारे, आमदार मकरंद पाटील, आमदार पंकज भुजबळ, आमदार जयकुमार गोरे, आमदार योगेश टिळेकर, आ. मनीषा चौधरी, जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, माजी आमदार कमल ढोले-पाटील यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.प्रा. राम शिंदे म्हणाले, ‘फुले दाम्पत्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी शासनाने केंद्र्राकडेप्रस्ताव पाठविला आहे. वास्तविक फुले दाम्पत्यांच्या नावामुळे पुरस्काराची उंची वाढणार आहे. ओबीसीच्या स्वतंत्र मंत्रालयासाठी येत्या वर्षात भरीव निधी उपलब्ध होईल. नायगावसह खंडाळा तालुक्याचा विकास करण्यासाठीनदी पुनर्जीवन योजनेतून मागेलतेवढा निधी उपलब्ध करून दिला जाईल.’आ. मकरंद पाटील म्हणाले, ‘नायगाव माझ्या मतदारसंघात आहे. यासारखे परमभाग्य दुसरं नाही. नायगावच्या १८ कोटींच्या विकास आराखड्यातील कामे पूर्ण करण्यासाठी उर्वरित निधी देण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत.’यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकास मान्यवरांनी अभिवादन केले. जयंतीच्या निमित्ताने सावित्रीबार्इंच्या प्रतिमेची गावातून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारीश्वेता सिंघल, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, कृष्णकांत कुदळे, बापूसाहेबभुजबळ, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, कृषी सभापती मनोज पवार, शिक्षण सभापतीराजेश पवार, महिला बालकल्याण सभापती वनिता गोरे, सभापतीमकरंद मोटे, जिल्हा परिषदसदस्य दीपाली साळुंखे, उदय कबुले, सरपंच निखील झगडे यांच्यासह नागरिकम मोठ्या संख्येने उपस्थित होते.सावित्रीबार्इंनी प्रतिष्ठा मिळवून दिलीमंत्री राम शिंदे म्हणाले, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी समाजकंटकांचा विरोध झुगारून मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महिला विविध क्षेत्रांत आज पुढे आहेत. त्यांचा हाच वसा पुढे नेण्यासाठी त्यांचे जन्मगाव असलेल्या नायगावला उच्च शिक्षणाचे केंद्र बनवू,’पालकमंत्री विजय शिवतारे म्हणाले, ‘सावित्रीबार्इंनी महिलांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आजच्या समाजाने महिलांना सन्मानाने वागवले पाहिजे. नवसमाज निर्मितीसाठी गावागावातील वाईट प्रवृत्तींना महिलांनीच मूठमाती दिली पाहिजे. सावित्रीबार्इंच्या कामाचा वसा जोपासण्यासाठी नायगाव येथे विधवा, परितक्त्या आणि निराधार महिलांसाठी शासकीय समाजकेंद्र उभारावे.’
नायगावला महिलांचे स्वतंत्र विद्यापीठ उभारावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2018 11:30 PM