कोरेगाव : आमदार महेश शिंदे यांनी पावणेदोन वर्षांत सुमारे २९ कोटी रुपयांची विकासकामे मंजूर केली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ७ कोटींची कामे सुरू केली आहेत,’ अशी माहिती माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांनी दिली.
यामध्ये शहरातील प्रभाग ७ व ८ भिलारे कॉर्नर-रामलिंग रोड-बुरुडगल्ली-व्यापार पेठ-चौथाई परिसर भुयारी गटारे आणि रस्ते ट्रिमिक्स काँक्रीटीकरण या ३ कोटी ५ लाख रुपयांच्या कामाचा प्रारंभ केला. यावेळी राहुल प्र. बर्गे, माजी नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे, राहुल र. बर्गे, वसीम इनामदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एन. टी. डेरे हे होते.
बर्गे म्हणाले, ‘शहरवासीयांच्या विश्वासाला तडा न जाऊ देता, त्यांनी बोलणे कमी आणि काम जास्त या नेहमीच्या कार्यशैलीप्रमाणे शहरासाठी भरीव निधी आणला आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे व गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या माध्यमातून अनेक वर्षे रखडलेली रस्त्याची कामे मार्गी लावली आहेत. कोरेगावकर जनता हुशार आणि अभ्यासू आहे. हिशेब करण्यात मागे पुढे पाहत नाही.’
फोटो
कोरेगाव शहरातील मंजूर विकासकामांची आमदार राजाभाऊ बर्गे यांनी पाहणी केली.