शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
2
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
3
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
4
घाबरू नका,'टायगर अभी जिंदा है', समरजित घाटगेंचा कार्यकर्त्यांना दिलासा
5
मतदान-मतमोजणीच्या आकड्यात तफावतीचा आरोप; निवडणूक आयोगानं बाजू मांडली, म्हणाले...
6
धक्कादायक! भाड्याचं घर, परदेशी कनेक्शन, १९० कोटींची फसवणूक; सायबर गुन्हेगारांचा पर्दाफाश
7
आता रॉकेट लॉन्चरही उडवू शकणार नाही 'पप्पू' यांची कार; मित्राने दिली खास गिफ्ट
8
Fengal Cyclone: फेंगल चक्रीवादळाचा बसणार तडाखा! कोणत्या राज्यांना रेड अलर्ट?
9
भारीच! आई अंगणवाडी सेविका, मुलगा झाला DSP; नातेवाईकांनी टोमणे मारले पण सोडली नाही जिद्द
10
शुबमन गिलला डेट करण्याची बॉलिवूड अभिनेत्रीची इच्छा, म्हणते- "तो खरंच खूप क्यूट..."
11
Adani Group News Update: 'गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन यांच्यावर अमेरिकेत लाचखोरीचा आरोप नाही,' अदानी समूहाचं स्पष्टीकरण
12
"ICU वॉर्डमध्ये क्षमतेपेक्षा जास्त मुलं होती..."; रुग्णालयातील आगीच्या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
13
आग्रा-लखनौ एक्स्प्रेस-वेवर भीषण अपघात, सैफई मेडिकल युनिव्हर्सिटीमधील ५ डॉक्टरांचा मृत्यू   
14
SIP की FD,पैशांची गुंतवणूक कुठे करायची? फायदा-तोट्याचे गणित समजून घ्या
15
आता १६ वर्षांखालील मुलांना फेसबूक, इन्स्टावर अकाऊंट उघडता येणार नाही, या देशाने घातली बंदी
16
माझा पराभव विरोधकांकडून नव्हे तर...; निकालानंतर राजेंद्र राऊतांनी बोलून दाखवली मनातील सल  
17
NTPC Green IPO Listing Today: एनटीपीसी ग्रीनचं निराशाजनक लिस्टिंग; मात्र नंतर स्टॉक सुस्साट, पहिल्याच दिवशी अपर सर्किट
18
मध्यमवर्गीयांमध्ये कोण येतात, किती होते कमाई; सर्वेक्षणातून झाला खुलासा, जाणून घ्या
19
अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपनंतर पुन्हा एकदा प्रेमात पडली मलायका?, मिस्ट्री मॅनसोबतचा व्हिडीओ व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाच्या भट्टाचार्य यांच्यावर सोपवली मोठी जबाबदारी

उंब्रज परिसरातील दोन टोळींतील सातजण हद्दपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2021 4:41 AM

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा: जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्यांचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळींतील एकूण ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा: जिल्ह्यातील उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्यांचे गुन्हे दाखल असलेल्या दोन टोळींतील एकूण सातजणांना सातारा, सांगली जिल्ह्यांतील वाळवा व शिराळा, कडेगाव तालुक्‍यांतून तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खुनाचा प्रयत्न, मारामारी, दमदाटी करणे यासारखे गंभीर गुन्हे करणाऱ्या विशाल अशोक दुटाळ (टोळी प्रमुख), किरण आनंदराव पवार (टोळी सदस्य), अविनाश राजेंद्र पवार (टोळी सदस्य), आशुतोष गणेश संकपाळ (सर्व रा. आंधारवाडी, ता. कऱ्हाड) तसेच उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, मारामाऱ्या, आदेशाचा भंग करणाऱ्या टोळीचा प्रमुख पवन ऊर्फ प्रवीण शामराव साळुंखे, राजेंद्र ऊर्फ भिकोबा मारुती मसुगडे (दोघे रा. नवे कवठे, ता. कऱ्हाड), कैलास तात्याबा चव्हाण (रा. कोपर्डे हवेली, ता. कऱ्हाड) यांना पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, शिराळा हे तालुके, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्‍यातून एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

जिल्ह्यात खून, खुनाचा प्रयत्न, मारामाऱ्या करणाऱ्या टोळीतील सदस्यांकडून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या होत्या. त्यानुसार उंब्रज पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यांनी संबंधितांवर वेळोवेळी कारवाया केल्या होत्या. त्यानंतरही त्यांच्या वर्तणुकीत सुधारणा होत नसल्याने त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या. त्यानंतरही संबंधितांच्या वागण्यात काहीच बदल होत नसल्याने स्थानिक पोलीस ठाण्यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्याकडे तडीपारीचे प्रस्ताव पाठविले होते. त्यावर सुनावणी झाल्यानंतर अखेर बन्सल यांनी संशयितांना हद्दपार केले. हे संशयित हद्दपारीच्या काळात जिल्ह्यात दिसले, तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे आदेश बन्सल यांनी सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.

फोटो आहेतः