शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

धारपुडी डेअरीत सोयाबीनपासून दूध सातजण ताब्यात : पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक माहिती उघड; सव्वा लाखांचे साहित्य जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:27 AM

पुसेगाव : धारपुडी, ता. खटाव येथील जय मिल्क डेअरीवर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी छापा टाकून

पुसेगाव : धारपुडी, ता. खटाव येथील जय मिल्क डेअरीवर कोरेगाव उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी छापा टाकून दुधामध्ये बेकायदेशीर भेसळ करण्यासाठी वापरण्यात येणारी १८५ किलो पावडर जप्त केली. तसेच भेसळ करणाºया व्यक्तींना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवारईत ४ हजार ३०० लिटर गायीचे दूध, ३८ लिटर सोयाबीन तेल, १५८ किलो कोरडी पावडर असा सुमारे १ लाख १६ हजार ५३४ रुपयांचा माल जप्त करण्यात आला. तसेच भेसळयुक्त दूध जागीच ओतून नष्ट करण्यात आले.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, धारपुडी (ता. खटाव) येथील जय मिल्क डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणावर दुधात भेसळ होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे गेल्या एक महिन्यापासून या डेअरीवर पाळत ठेवण्यातआली होती.

त्यानुसार पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वत: उपविभागीय अधिकारी प्रेरणा कट्टे यांच्या पथकाने संबंधित डेअरीवर छापा टाकला. त्यावेळी दूध पावडरची ६ खोकी त्यात भेसळ करण्यासाठी वापरली जाणारी १८५ किलो पावडर ताब्यात घेण्यात आली.

याबाबत डेअरीचे मालक तुकाराम यादव व मॅनेजर मनीष नारायण जगताप यांच्याकडेविचारणा केली असता त्यांनी भुरकवडी येथील दत्ता चव्हाण हे पावडर पुरवत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर दत्ता चव्हाण यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी येरळवाडी येथील पृथ्वीराज मिल्क या डेअरीलासुद्धा १ गाडीपावडर पुरवल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी येरळवाडी येथे जाऊन तपासणी केली असता तेथील पृथ्वीराज मिल्क या डेअरीत काहीही सापडले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, भेसळ करण्यासाठी वापरण्यात आलेले पदार्थ व संबंधित व्यक्तींना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. यात अश्विन भगवान बोटे, चौरंगदिनकर बोटे (रा. दरजाई), रणजित जगन्नाथ माळी (रा. खटाव)शरद केशव गायकवाड (रा. खटाव), मनिष नारायण जगताप (रा. धारपुडी), विरू ऊर्फ पिंटू जयसिंग पाटोळे(रा. दरजाई) व तमन्ना इबने हुसेन रजवे (रा. धारपुडी) यांचा समावेश आहे. या कारवाईमुळे दूध डेअरी मालकांचे धाबे दणाणले आहेत.भेसळ करणाºयांवर कठोर कारवाईदुधात भेसळ होत असल्याची माहिती समोर आल्यानंतर धारपुडी येथील दूूध डेअरीवर छापा टाकण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे सवा लाखांचे साहित्य जप्त केले असून भेसळयुक्त दूध नष्ट केले आहे. अन्न औषध विभागाच्या अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे. दूधात अशा प्रकारे भेसळ करणाºयांवर यापुढे कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे यांनी दिला आहे.