सातारा : मेढा व वाठार पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाळूची तस्करी करणाऱ्या सातजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सातारा जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले आहे.मयूर विकास जाधव (वय २४, रा. शेते, ता. जावळी), मंगेश चंद्रकांत शिर्के (वय २२, रा. म्हसवे, ता. जावळी), भूषण संभाजी भोईटे (वय २६, रा. विद्यानगर फलटण), अकबर बाबूलाल बागवान (वय ४२, रा. लोणंद, ता. खंडाळा), संदीप किसन वाघ (वय २८, रा. अमृतवाडी, ता. वाई), आकाश शिवाजी सावंत (वय ३३, रा. चिंधवली, ता. वाई) अशी तडीपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
या सातजणांची टोळी तयार झाली होती. या टोळीचा प्रमुख मयूर जाधव हा होता. जावळी तसेच कोरगाव तालुक्यात या टोळीवर सरकारी कामात अडथळा आणने, दरोड्यासह वाळू चोरीचेही गुन्हे दाखल आहेत.
या सर्वांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देऊनही त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेला उपद्रव होत होता. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जनतेमधून होत होती. त्यामुळे त्यांच्यावर एक वर्षासाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.