योगेश घोडके।सातारा : साताऱ्याला खेळाची मोठी परंपरा असून, या परंपरेचा पाया आॅलिम्पिकपटू खाशाबा जाधव यांनी रचला. हा पाया अन् त्यावर उभी राहणारी क्रीडा संस्कृती बळकट करण्याचे काम साताºयातील खेळाडू करीत आहेत. बालेवाडी (पुणे) येथे आयोजित करण्यात आलेल्या खेलो इंडिया युथ गेम्स या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत साताºयाच्या सात खेळाडूंनी सुवर्ण, रौप्य, कांस्यपदकांची लयलूट करून ‘हम भी किसीसे कम नहीं’ हे साध्य करून दाखवलं आहे.
या स्पर्धेमध्ये धावणे प्रकारात सुदेष्णा शिवणकर हिने दोन सुवर्णपदके, बॅडमिंटनमध्ये आर्या देशपांडे, वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार, ज्युदो प्रकारात तन्वीन तांबोळी व आर्यन वर्णेकरने जलतरण, क्रीडा प्रकारात दोन सुवर्ण व दोन रौप्यपदकांची, तर ज्युदो प्रकारात मयुरी देवरे हिने रौप्यपदक व थाळीफेक प्रकारात आदिती बुगड हिने कांस्यपदकाची भर टाकत क्रीडा क्षेत्रात साताºयाच्या खेळाडूंना खेळाचा वसा जपला आहे.
खर्शी येथील सुदेष्णा शिवणकर हिने १०० मीटर धावणेमध्ये सुवर्णपदक पटकाविले. तसेच १०० मीटरचे अंतर १२.४८ सेकंदात पार करत माणदेशी एक्स्प्रेस ललिता बाबर यांचा कित्ता गिरवत सुवर्णपदक पटकावले आहे. तिने यापूर्वी ६४ व्या आॅल इंडिया शालेय गेममध्ये ४ बाय १०० मीटर धावणे रिले प्रकारात ४८. ६३ सेकंदात या विक्रमी वेळेत पूर्ण करून सुवर्णपदक पटकावले होते.
बॅडमिंटनमध्ये आर्या देशपांडे हिने तिची सहकारी अनन्या फडके हिच्या साथीने २१-० अशी खेळी करत सुवर्णपदक पटकाविले. तसेच सुदेष्णा शिवणकर व आर्या देशपांडे या दोघीही गुरुकुलच्या विद्यार्थिनी आहेत. या दोघींनी खेलो इंडिया स्पर्धेत साताºयाला तीन सुवर्ण पदके मिळवून दिले.
वेटलिफ्टिंगमध्ये वैष्णवी पवार हिने ८१ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळविले. तिने स्नॅचमध्ये ५४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये ६४ असे एकूण ११४ किलो वजन उचलले. तर रहिमतपूरच्या तन्वीन तांबोळी हिने २१ वर्षांखालील व ७० किलो वजन गटामध्ये सुवर्णपदक पटकावले. ती रहिमतपूरच्या रोझरी स्कूलची माजी विद्यार्थिनी आहे. तर वेटलिफ्टिंगमध्ये मयुरी देवरे हिने ७६ किलो, स्नॅचमध्ये ७९ किलो, क्लीन व जर्कमध्ये ९७ किलोत रौप्यपदक मिळविलेथाळीफेकमध्ये पहिल्यांदाच पदकम्हसवड येथील माणदेशी चॅम्पियनची खेळाडू आदिती बुगड हिने पुणे येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया युथ गेम्समध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्यपदक पटाकावले. या क्रीडा प्रकारात महाराष्ट्राला पहिल्यांदाच पदक मिळवून देण्याची कामगिरी तिने केली आहे. या स्पर्धेत आदितीने ३९. ०८ मीटर थळीफेक करून कांस्यपदक पटकाविले..भाजी विक्रेते, रिक्षाचालक यांच्या मुलीवैष्णवी पवार हिचे वडील भाजी विक्रेते आहेत तर मयुरी देवरे हिचे वडील रिक्षाचालक आहेत. दोघींच्याही घरची परिस्थिती बेताची; मात्र वडिलांनी जमेल तसे मुलींना प्रोत्साहन दिले आणि रिक्षाचालक व भाजी विक्रेत्यांच्या मुलींनी हा पराक्रम गाजवला. वैष्णवी ही येथील अनंत इंग्लिश प्रशालेत नवव्या इयत्तेत शिकत असून, आपल्या मुलीने आपल्या गावाचे नाव उज्ज्व करावे, हे पाहिलेले स्वप्न वैष्णवीच्या या कामगिरीमुळे साकार केली.