म्हसवड : माण तालुक्यात पाणीटंचाईने दुष्काळाची भीषणता वाढू लागली आहे. पाणी व चारा टंचाईमुळे जनावरांसाठी येथील माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी शासनाच्या मदतीविना सुरू केलेल्या चारा छावणीत १९ दिवसांतच सुमारे सात हजार जनावरे दाखल झाली आहेत.चारा छावणीत सध्या ७,४२१ लहान मोठी जनावरे दाखल झाली. यामध्ये मोठी ५,९७८ तर लहान १४४३ जनावरांचा समावेश आहे. छावणीतील प्रत्येक जनावरास दररोज १५ किलो ओला चारा, कडबाकुट्टी व त्यासोबतच पेंड दिली जाते. एक जानेवारीपासून सुरू झालेल्या या छावणीत सुमारे १५ ते २५ किलोमीटर दूर अंतरावरील गावातील दररोज पाचशेहून अधिक संख्येने जनावरे या छावणीत दाखल झाली आहेत. छावणीत जनावरांना उन्हापासून संरक्षण मिळावे, यासाठी नॉयलॉन नेटचे छत व जनावरासोबत मुक्कामी आलेल्या शेतकरी कुटुंबांचा कडाक्याच्या थंडीपासून बचाव व्हावा, यासाठीही उबदार ब्लँकेट्सचे मोफत वाटप केले जात आहे. अंधाराची समस्या दूर करण्यासाठी छावणीत विजेचे दिवे, जनावरांची पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून प्राथमिक उपचाराची आवश्यक साधने उपलब्ध केली आहेत.
म्हसवडच्या चारा छावणीत सात हजार जनावरे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:17 PM