नीलेश साळुंखेकोयनानगर : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरणातपाणीसाठा सध्या १०.७१ टीएमसी आहे. मृत पाणीसाठा वगळता धरणात केवळ ५.५९ टीएमसी एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे. गत सतरा वर्षांतील हा निच्चांकी साठा आहे. यापूर्वी १८ जून १९९६ ला धरणातील पाणीसाठा १०.६६ टीएमसी इतका होता.सातारा जिल्ह्यासह पाटण तालुक्यात यंदा पावसाने ओढ दिल्यामुळे आटलेले ओढे, नाले प्रवाहित झालेच नाहीत. धरणेही कोरडी पडल्याने नद्याही आटू लागल्या आहेत. कोयना धरणाच्या पाण्यानेही तळ गाठला आहे. पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्णपणे दडी मारल्यामुळे विदारक स्थिती निर्माण झाली आहे. अपेक्षित पाऊस पडला नसल्याने धरणात गत बारा वर्षांतील निच्चांकी पाणीसाठा शिल्लक आहे. परिणामी वीजनिर्मिती थांबली आहे. सिंचनासाठीही मर्यादा आल्या आहेत.कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात दिवसेंदिवस घट होत आहे. ही परिस्थिती अशीच राहिली तर अल्पावधीतच निच्चांकी पाणीसाठ्याची नोंद होऊ शकते. यापूर्वी २०१९ मध्ये धरणातील पाणीसाठा १०.७३ टीएमसी एवढा निच्चांकी नोंदला गेला होता. शुक्रवार सायंकाळी कोयना धरणातील पाणीसाठा १०.७१ टीएमसी इतका शिल्लक आहे.कोयना धरणाच्या निर्मितीनंतर १८ जून १९९६ रोजी पाणीसाठा १०.६६ टीएमसी होता. हा निच्चांकी पाणीसाठा असून, त्यावेळी धरणाची साठवण क्षमता ९८.५ टीएमसी होती. साठवण क्षमता १०५.२५ टीएमसी वाढविल्यानंतर शुक्रवारचा १०.७१ टीएमसी हा निच्चांकी पाणीसाठा आहे. धरणातील उपलब्ध पाणीसाठा हा १५ जुलैपर्यंत पुरेसा आहे, अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे उपविभागीय अभियंता आशिष जाधव यांनी दिली.
यापूर्वीचा पाणीसाठादिनांक : पाणीसाठा टीएमसीत१० जून २०११ : ३०.९३३ जुलै २०१२ : २६.६६९ जून २०१३ : ३१.४१११ जुलै २०१४ : १२.५५१९ जुलै २०१५ : २९.७१२९ जून २०१६ : १२.१८२२ जून २०१७ : १६.३०२३ जून २०१८ : २५.६६२७ जून २०१९ : १०.७३४ जुलै २०२० : ३१.९४६ जून २०२१ : २७.८८१ जुलै २०२२ : १३.५५२३ जून २०२३ : १०.७१
इतर पंधरा धरणांत केवळ ११.७७ टीएमसी पाणीसाठाधरणाचा पाणीसाठा कंसात क्षमतामोठे प्रकल्पधोम १.९४ (१३.५०)धोम बलकवडी ०.६६ (४.०८)कण्हेर १.२१ (१०.१०)उरमोडी २.८६ (९.९६)तारळी २.९२ (५.८५)मध्यम प्रकल्पयेरळवाडी ०.०९ (१.१५)नेर ०.१५ (०.४२)रानंद ०.०५ (०.२५)आंधळी ०.०४ (०.३३)नागेवाडी ०.०६ (०.२३)मोरणा ०.४५ (१.३९)उत्तरमांड ०.७४ (०.८८)महू ०.७४ (१.१०)हातगेघर ०.०२ (०.२६)वांग ०.३२ (२.७३)