संजीव वरे -- वाई या वर्षी वाई तालुक्यात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. येत्या काळात पाणीटंचाई व दुष्काळाचे सावट उभे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढे अनेक प्रश्न उभे राहिले असताना अनेक शेतकऱ्यांची गोची झाली आहे. राष्ट्रीयकृत बँकेतून पीक व शेतीपूरक कर्जे गेली दोन महिने मंजूर झालेली आहेत; मात्र शेतीच्या सातबाऱ्यावर त्याची नोंद व बोजा न चढवून मिळाल्यामुळे बँका पैसे देईना तर तलाठी, सर्कल व तहसील विभाग शासनाचे संगणीकृत उतारे देण्याचे आदेश असल्याने पूर्वीसारखे हस्तलिखित उतारे व दाखले देता येत नाहीत, हे कारण सांगून अडवणूक केली जातेय.गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी बँका व तलाठी कार्यालयात हेलपाटे मारत आहेत; परंतु याची दखल कोणीच न घेत असल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहेत. या विभागाबाबत शेतकऱ्यांच्यात असंतोष निर्माण झाला असून, संतापाची लाट उसळली आहे.दरवर्षी तालुक्यातील शेतकरी हे सोसायट्या, जिल्हा सहकारी बँक व राष्ट्रीयकृत अनेक बँकातून शेतीसाठी पीक कर्जे व पुरक व्यवसायासाठी कर्जे घेत असतात. या वर्षीही अनेक शेतकऱ्यांची बँकांनी कर्जे मंजूर केली आहेत.त्यांच्या खात्यावर रक्कम टाकण्यापूर्वी शेतकऱ्यांना आपल्या कर्जाचा बोजा चढवून त्याचा फेरफार व सातबारा बँकांना द्यावा लागतो. दि. २३ आॅक्टोबर २०१५ च्या शासन संगणकाद्वारे सर्व सातबारे व दाखले देणार या आदेशाचे कारण पुढे देत तलाठी सर्कल व तहसील विभाग गेली दोन महिने सातबारे व दाखले देत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना मंजूर असलेले कर्जाऊ पैसे बँका देत नाहीत. उताऱ्यासाठी शेतकरी बँका व तलाठी कार्यालयामध्ये हेलपाटे मारत आहेत. व आर्थिक अडचणीत आले आहेत. याबाबत महाराष्ट्र शासनस्तरावर लवकर निर्णय घेण्याची मागणी शेतकरी करत आहेत.हेलपाट्यावर हेलपाटे..!संगणकीकरण उतारे व दाखले यांच्या नोंदी राहतात. परंतु हस्तलिखित उतारे व दाखले यांच्या नोंदी नसतात. याचे पैसे संबंधितांना मिळतात. त्यामुळे अनेकांची अडचण झाली आहे त्यामुळेही अनेकवेळा टाळाटाळ व दिरंगाई लावली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना हेलपाटे मारून त्याचा वेळ व प्रवासखर्च जातो.गेली दोन महिने झाले. बँकेतून कर्ज मंजूर झाले आहे. परंतु तलाठ्याकडून त्याचा बोजा चढवून फेरफार व सातबारा न मिळाल्यामुळे मला बँक पैसे देत नाही. याबाबत संबंधित विभागाकडे सारखे हेलपाटे मारत आहेत.- देविदास जगताप, शेतकरी, शेंदुरजणे,ता. वाई.मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र पाठवले आहे. परंतु आमची दखल घेतली जात नाही. संगणकीकरणाला अजून किती कालावधी लागणार व आम्हाला पैसे मिळणार का नाही? या चिंतेत सध्या आम्ही आहोत.- धनाजी शिंदे, परखंदीबँका ‘उदार’ अन्अण्णासाहेब ‘ताठ’बँकांनी शेतकऱ्यांना कर्जे मंजूर केली आहेत. काहीच्या खात्यावरही पैसे टाकले गेले आहेत़; परंतु तलाठ्याच्या कर्जाचा बोजा न चढवून सातबारा उतारा न मिळाल्याने पैसे देत नाहीत. तर आम्हाला अधिकार नाही यामुळे ‘अण्णासाहेब’ ताठ आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणाकडे जायचे, त्यांना वाली कोण?तलाठीच मिळेनात..तालुक्यात एका तलाठ्याकडे पाच ते सहा गावे आहेत. त्यामुळे अनेक गावात तलाठीच पोहोचत नाहीत. अनेक गावे असल्याचे कारण सांगितले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना दाखले उतारे वेळेवर मिळत नाहीत व अडचणी निर्माण होतात.
हातात सातबारा.. तरीही कर्जाचा फॉर्म कोरा!
By admin | Published: December 09, 2015 11:54 PM