पाटण : पाटण तालुक्यात अवेळी झालेल्या पावसामुळे १२ हजार ३३२ शेतकऱ्यांचे २ हजार ९९९ हेक्टरवरील पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. त्याचे पंचनामे करून सुमारे २ कोटी ५५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल पाठवला होता. त्यापैकी ७० लाख रुपयांचा निधी ६५ गावांमध्ये ३ हजार ३७५ शेतकºयांना वितरित करण्यात येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अविनाश मोरे यांनी पाटण पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली.पाटण पंचायत समितीची मासिक सभा मंगळवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती उज्ज्वला जाधव होत्या. प्रारंभी शिक्षण विभागाच्या आढाव्यादरम्यान आक्षेप घेत सदस्यांनी शिक्षण विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. तालुक्यातील गणेवाडी, हेळवाक येथील शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा पट अधिक असून, तेथे फक्त दोनच शिक्षक कार्यरत आहेत, अशी तालुक्यातील दयनीय स्थिती असून, यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकांच्या बदल्या कराव्यात, सदस्यांकडून करण्यात आली. शिक्षक संघटनांचे अध्यक्ष शाळेत कमी आणि बाजार फिरताना दिसून येतात, अशी तक्रार सीमा मोरे यांनी केली तर काही शिक्षक शाळेत तंबाखू, गुटखा खाऊन येतात, अशी तक्रार सदस्य मोरे यांनी केली.चौदाव्या वित्त आयोगातील सण २०१८-१९ साठी ग्रामपंचायतींना आलेल्या निधीपैकी शून्य टक्के निधी दोनशे ग्रामपंचायतींनी वापरला आहे. यामध्ये सभापती आणि उपसभापती हे कमी पडले असून, त्यांचे अपयश आहे, अशी तक्रार संतोष गिरी यांनी यावेळी केली.आरोग्य केंद्रात कर्मचाºयांचा मनमानी कारभारहेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात सतत वैद्यकीय डॉक्टरांची अदलाबदल का सुरू आहे? कशासाठी सुरू आहे? असा प्रश्न उपसभापती राजाभाऊ शेलार यांनी उपस्थित केला. त्यावर वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांनी जिल्हास्तरावरून बदल्या होत असल्याचे सांगितले.तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र्रातील डॉक्टरांना त्यांचा कर्मचारी वर्ग जुमानत नाही, अशी तक्रार सदस्य संतोष गिरी यांनी केली तर ओपीडीमध्ये डॉक्टर नसतात, त्याअभावी काही प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रे बंद राहतात, अशी तक्रार सीमा मोरे यांनी केली.घोटाळे करणाºया ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करणार : साळुंखेपाटण तालुक्यातील ढेबेवाडी विभागातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसेवकांनी आर्थिक घोटाळे केले आहेत. अशा ग्रामसेवकांवर फौजदारी गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांनी पंचायत समितीच्या मासिक सभेत दिली.गटशिक्षण अधिकाºयांना ‘क्लीन चीट’पाटण शहरातील एका शिक्षिकेने गटशिक्षणाधिकारी नितीन जगताप यांच्यावर केलेले आरोप यांची चौकशी मुख्य कार्यकारी अधिकाºयांमार्फत सुरू असून, त्यात तथ्य नसल्याचे दिसत आहे. त्याची चौकशी केली असता, तसा गोपनीय अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे पाठवला आहे. या प्रकरणातील मोबाईलवरील संभाषण तपासले असता प्रथमदर्शनी ते तथ्यहीन असल्याचे सांगून मीना साळुंखे यांनी गटशिक्षणाधिकारी यांना या प्रकरणात ‘क्लीन चीट’ दिली.