शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
5
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
6
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
7
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
8
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
9
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
10
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
11
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
12
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
13
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
15
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
16
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
17
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
18
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

वटवृक्षांच्या छायेत नांदते ‘वडाचे म्हसवे’

By admin | Published: March 25, 2015 12:32 AM

गावाला ऐतिहासिक किनार : आशिया खंडातील सर्वात महाकाय वडाचे झाड

दत्तात्रय पवार - कुडाळ  वैराटगडाच्या पायथ्याशी वसलेले म्हसवे हे गाव आजही इतिहासाच्या पाऊलखुणा जपत आपली सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरा जपत आहे. गावात आशिया खंडातील सर्वांत विशाल असे वडाचे झाड आहे. या झाडापासून अनेक वडाची झाडे येथे विस्तारलेली पाहायला मिळतात. गावात प्रवेश करताच उजव्या बाजूला वडांची झाडे दृष्टीस पडतात. त्यामुळे जावळीतील म्हसवे हे गाव ‘वडाचे म्हसवे’ म्हणून ओळखले जाते. तर शिवकालीन ओळख जपणाऱ्या या गावातील वडांची नोंद ब्रिटिशांच्या दप्तरी आजही पाहायला मिळते.पाचवड-कुडाळ राज्यमार्गावर असणाऱ्या वडाचे म्हसवे गावाची लोकसंख्या सुमारे तीन हजार आहे. राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेचे म्हणून या गावाची तालुक्यात ओळख आहे. वैराटगडाच्या पायथ्याशी वसल्यामुळे शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीचा, पराक्रमाचा इतिहास गावाने पाहिला आहे. तर पाच पांडव वनवासात भटकंती करीत असताना वाईच्या विराटराजाच्या पदरी आले होते. त्यावेळी ते गाई-गुरे चारण्यासाठी वैराटगडावर व म्हसवे परिसरात फिरत होते, अशी आख्यायिका सांगितली जाते. यामुळे गावाला एक वेगळी ऐतिहासिक, धार्मिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. गावात पुरातन जननीदेवीचे मंदिर आहे.ब्रिटिश राजवटीत एका अधिकाऱ्याने वडाचे म्हसवे गावाला भेट दिली. त्यावेळी तो येथील महाकाय वडाचे झाड पाहून आश्चर्यचकित झाला. येथील नयनरम्य परिसर पाहून येथे काही दिवस वास्तव्य केले व विशाल वटवृक्ष तसेच वन्यजीवांचा अभ्यास केला. आजही त्याने आपल्या शब्दांत या वडाचे जे वर्णन केले आहेत ते ब्रिटिश नोंदवहीत पाहायला मिळते.शासनाने दुर्मिळ होत चाललेल्या वडांचे संवर्धन केल्यास गावच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा वडाचे म्हसवे ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. विशाल झाडांचे गाववडाचे म्हसवे गावात पाच एकर परिसरात महाकाय वड पसरलेला आहे. या वडाने अनेक वडांना जन्म दिला आहे. याठिकाणी सध्या ३० ते ४० महाकाय वटवृक्ष आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात एका ठिकाणी असणाऱ्या वडांच्या झाडांमुळे एक ‘वडांचं गाव’ वसल्याप्रमाणे हे दृश्य दिसते. वृक्षपे्रमी हे वैभव पाहण्यासाठी, अभ्यासासाठी मोठ्या प्रमाणात गावाला भेटी देतात. जागतिक वनदिनानिमित्त वनविभागाकडून येथे विविध कार्यक्रम होतात.