म्हसवड : ढाकणी येथील गावचे मुख्य ठिकाण म्हणजे गावचा पार. या पारावर असणाऱ्या पिंपरणीचे झाडाच्या सावलीतच अनेक दशके सर्व सण, उत्सव, ग्रामदैवताच्या यात्रा पार पडल्या. विविध सार्वजनिक कार्यक्रम, हरिनाम सप्ताह व्हायचे. पण सोमवारी पहाटे वादळी वाऱ्यात या झाडाचा बहुतांशी भाग कोसळल्याने गावची शान असलेला पार बोडका दिसत आहे. सावली हरवल्याने कोसळलेला झाडाचा भाग पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले.
म्हसवड-मायणी रोडवर म्हसवडपासून तेरा किलोमीटर अंतरावर ढाकणी हे गाव आहे. सुमारे दोन हजार लोकसंख्या गावची आहे. येथील नागरिकांचा शेती हाच प्रमुख उद्योग. या गावातील बहुतांशी नागरिकांच्या बसण्या-उठण्याचे व दुपारच्या विश्रांतीचे मुख्य ठिकाण होते. गावच्या मध्यवस्तीत असणारा पार हेच ठिकाण आहे. दीडशे वर्षांपासून हा पार सर्व सण उत्सव, जत्रा, करमणुकीचे कार्यक्रम, शेतातून दमून आलेल्या नागरिकांचे दुपारच्या उन्हाच्या झळांपासून संरक्षण व विश्रांती घेण्याचे ठिकाण होते. साधारण पाचशे मीटरच्या परिघात हे झाड सावली देत होते. या झाडातून ऊन या परिसरात पडत नव्हते. एवढी या पिंपरीणीच्या झाडाची गर्द सावली पडायची. या झाडाचा बुंधा भला मोठा होता. त्यामुळे गावातील बहुतांशी नागरिकांचे थांबण्याचे ठिकाण पारच होता. हे नाते अनेक वर्षांपासूनचे होते. बाहेरगावचा कोणी एखाद्याकडे आला तर ते कुठे भेटतील तर कुटुंबातील व्यक्ती सांगायची, ‘जावा पारावर असतील’. मग त्यांची पारावर गाठभेट व्हायची. हा शिरस्ता गेली अनेक वर्षे अनेकांनी अनुभवला आहे.
शाळेचे कार्यक्रमही येथेच
अनेक वर्षांपूर्वीचे ढाकणीचे आनबान शान असणारे पिंपरणीचे झाड सोमवारी पहाटे चारच्या सुमारास वादळी वाऱ्याने कोसळले. गावात यात्रेची मीटिंग, ग्रामसभा, गजी नृत्य, २६ जानेवारी शाळेचे कार्यक्रम सादर करण्यात येत असत. मोठ्या संख्येने लोक या झाडाखाली विश्रांती घेत होते, आता हे झाड पडल्याने गाव सावलीला पोरके झाले आहे.
कोट
गावची शान म्हणजे गावच्या मध्यवस्तीत असणारा पार. पारावरील पिंपरणीचे झाड वादळी वाऱ्यात झाड कोसळले. वाढदिवसादिनी गावातील नागरिकांना विविध फळझाडे व वृक्षांचे वाटप करून वृक्षसंवर्धनाचा संकल्प केला आहे.
- दत्ता शिंदे,
सरपंच, ढाकणी, ता. माण
फोटो
३१ढाकणी-ट्री
माण तालुक्यातील ढाकणी येथील दीडशे वर्षे जुन्या पिंपरणीच्या झाडाचा काही भाग सोमवारच्या पावसात कोसळला. (छाया : सचिन मंगरुळे)
===Photopath===
310521\img-20210531-wa0037.jpg
===Caption===
ढाकणी गांवची दिडशे वर्षापासूनची सावली हरवली...