येथील शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी आॅनलाइन व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. त्यांच्या हस्ते जयंतीदिनाच्या निमित्ताने महाविद्यालयात शाहूजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. सुरेश यादव उपस्थित होते.
डॉ. कपिल राजहंस म्हणाले, गादीवर विराजमान झाल्यावर शाहू महाराजांनी संपूर्ण संस्थानाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी संस्थानातील विविध समस्यांचे आकलन करून घेतले. त्या दूर करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. जातीव्यवस्था निर्मूलन झाले पाहिजे यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यासाठी विविध कृतिशील उपक्रम राबवले. त्यांच्या पुरोगामित्व विचारातूनच माधवराव बागल, भास्करराव जाधव, कर्मवीर भाऊराव पाटील अशी महान व्यक्तिमत्त्वे घडली. गावकुसाबाहेरील समाजाच्या अडचणी त्यांनी पाहिल्या. आणि समाजाच्या मुख्य प्रवाहात त्यांनी या अस्पृश्य समाजाला आणले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जडणघडणीत शाहू महाराजांचा सिंहाचा वाटा आहे.
प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय इतिहास विभागप्रमुख प्रा. सचिन बोलाईकर यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. टी. एम. आत्तार यांनी केले, तर आभार प्रा. संभाजी पाटील यांनी मानले.