पाटण : विधानसभा निवडणुकीनंतर हार-जीत आणि एकमेकांवर टीकेचा आसूड ओढणाऱ्या पाटण तालुक्यात परवा बऱ्याच कालावधीनंतर दुर्मीळ चित्र पाहावयास मिळाले. निमित्त होते लोकनेते बाळासाहेब देसार्इंच्या जयंतीचे. त्यासाठी मतभेद बाजूला ठेवून एकाच व्यासपीठावर मांडीला मांडी लावून बसलेल्या आमदार शंभूराज देसाई व माजी सभापती सत्यजित पाटणकर यांनी काही क्षणापुरते का होईना तालुक्यातील जनतेला सुखद धक्का दिला.पाटण पंचायत समितीच्या वतीने दरवर्षी लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या जयंतीचे आयोजन केले जाते. यामध्ये शिक्षण विभागाचा पुढाकार असतो. पंचायत समितीत कोणाचीही सत्ता असू दे, लोकनेत्यांसाठी देसाई व पाटणकर गटाचे पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित असतात. तरी सुद्धा विधानसभा निवडणुकीनंतर तालुक्यातील जनतेला देसाई व पाटणकर हे दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर पाहावयास मिळाले नव्हते.पाटणच्या राजकारणात समोरासमोर येण्याची भाषा केली जाते. मात्र तसा योग आलेला नाही. मात्र लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे अतुल्य कर्तृत्व व तालुक्यासाठी त्यांचे योगदान पाहता त्यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमास राजकारणाचा निकष आड येत नाही. दोन्ही नेत्यांची पावले लोकनेत्यांसाठी आपोपच वळतातच. पाटण पंचायत समितीत पाटणकर गटाचे सभापती तर देसाई गटाचा उपसभापती आहे. त्यामुळे निमंत्रणपत्रिका काढताना आमदार शंभूराज देसाई व पंचायत समितीचे तत्कालीन सभापती सत्यजित पाटणकर यांची नावे छापलेली दिसतात. मात्र, पंचायत समितीची सत्ता असताना लोकनेत्यांच्या जयंती कार्यक्रमाला दोन्ही नेते व गटातील मान्यवरांना निमंत्रित करण्याचे मोठेपण दाखविले जाण्याची अपेक्षा व्यक्त होताना दिसते. (प्रतिनिधी)...तरच सार्थक होईलपाटण पंचायत समितीचे नामकरण ‘लोकनेते बाळासाहेब देसाई भवन पंचायत समिती पाटण’ असे करण्यात आले आहे. त्यासाठी शासनाची अधिकृत परवानगीसुद्धा मिळाली. मात्र, त्यानंतरही पंचायत समितीच्या कागदपत्रांवर किंवा मासिक सभेत लोकनेत्यांच्या नावाचा उल्लेख टाळताना दिसतो. राजकारण बाजूला ठेवून लोकनेत्यांसाठी अंमलबजावणी झाली तरच लोकनेते बाळासाहेब देसार्इंची जयंती तालुक्याच्या दोन्ही नेत्यांनी उपस्थिती दाखवून साजरी केल्याचे सार्थक होईल.
शंभूराज-सत्यजित एकाच व्यासपीठावर
By admin | Published: March 11, 2015 10:55 PM