शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद, मकरदआबांना लाल दिवा..

By नितीन काळेल | Published: October 04, 2023 7:11 PM

अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचाय

सातारा : सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर २० वर्षांपासून वर्चस्व गाजवलेल्या राष्ट्रवादीच्या या बालेकिल्ल्याला चार वर्षांत भगदाड पडत गेले. ताकद कमी झाली. आता पक्षात फूट असलीतरी अजितदादा गटाला पुन्हा साताऱ्याला बालेकिल्ला बनवायचे आहे. त्यामुळे नव्या राजकीय घडामोडीत दबावातून का असेना पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे घ्यायचे आहे. यातूनच आमदार मकरंद पाटील यांना लाल दिवा देण्याचे निश्चीत आहे. त्यामुळे सध्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडील पालकमंत्रिपद जाण्याचे संकेत आहेत.महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर सातारा जिल्ह्याने यशवंतराव चव्हाण यांच्या रुपाने काॅंग्रेसवर भरभरून प्रेम केले. पण, १९९९ ला शरद पवार यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसची स्थापना केली आणि जिल्हा पवार यांच्या पाठिशी ठामपणे राहिला. त्यावेळी विधानसभेचे १० पैकी ९ आमदार राष्ट्रवादी काॅंग्रेसचे झाले. त्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादीच सबकुछ होती. पण, गेल्या चार वर्षांत राष्ट्रवादीला हादरे बसले. त्यामुळे भाजपची ताकद वाढली.सध्यस्थितीत राष्ट्रवादीतही दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटांनी सातारा जिल्ह्यात ताकद वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना जिल्ह्यावर कब्जा मिळवायचा आहे. यासाठी रणनिती आणि दबावाचे राजकारण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यातूनच साताऱ्याचे पालकमंत्रीपदही हवे आहे. यासाठी स्वत: अजित पवार आग्रही आहेत. यासाठी अंतर्गत राजकीय घडामोडी घडू लागल्या आहेत. पण, हे पद कोणाला द्यायचे असा प्रश्न असलातरी वाईचे आमदार मकरंद पाटील यांना लाॅटरी लागण्याचे संकेत आहेत.आमदार मकरंद पाटील अनेक वर्षांपासून राजकारणात आहेत. वाई विधानसभा मतदारसंघावर वर्चस्व आहे. मकरंद पाटील दादा समऱ्थक झाले आहेत. तीन महिन्यांपूर्वी अजित पवार भाजपबरोबर गेले त्यावेळीच मकरंद पाटील यांना मंत्रिपद देण्याचे निश्चीत होते. पण, त्यांनी तातडीने निर्णय न घेतल्याने मंत्रीपद रखडल्याचे सांगण्यात येते. पण, आज राष्ट्रवादीच्या कोट्यातील एक मंत्रिपद रिक्त आहे. ते मकरंद पाटील यांचेच असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात पाटील यांना लाल दिवा मिळणारच असल्याचा विश्वास राष्ट्रवादीचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्यामुळे पितृपंधरवडा झाल्यानंतर मकरंदआबाचा मंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल असे संकेत आहेत. त्यातूनच अजित पवार यांना साताऱ्याचे पालकमंत्रिपदही हवे आहे. या जागेवर मकरंद पाटील यांची वर्णी लागणार हे स्पष्ट आहे. यातूनच अजितदादा जिल्ह्यात पकड मजबूत करण्याचा प्रयत्न करणार आहेत.

रामराजे-मकरंदआबांची जोडी...राष्ट्रवादीतील फुटीनंतर जिल्ह्यात दोन गट झाले आहेत. अजितदादा गटात विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, आमदार दीपक चव्हाण आदी आहेत. यापूर्वी राष्ट्रवादीची जिल्ह्यातील कमान खासदार लक्ष्मणराव पाटील आणि रामराजेंनी सांभाळली. आता लक्ष्मणराव पाटील यांच्या पश्चात मकरंद पाटील हे रामराजेंच्याबरोबर आहेत. या दोघांवरच अजितदादा गट जिल्ह्यात मजबूत मोट बांधू पाहत आहे.

... तर माढा, सातारा लोकसभेला दोघांचे बंधू उमेदवारराष्ट्रवादी काॅंग्रेस एकसंध होती तेव्हा सातारा लोकसभा मतदारसंघातून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांना उमेदवारी मिळेल अशी चर्चा होती. नितीन पाटील हे मकरंद पाटील यांचे बंधू आहेत. तर माढ्यातून रामराजे किंवा त्यांचे बंधू जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर हे उभे राहणार अशी अटकळ होती. पण, गेल्या तीन महिन्यात बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्यात. महायुतीत माढा राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्यास अजितदादा गटातून संजीवराजे दावेदार होऊ शकतात. सध्या त्यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद आहे. तर सातारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे गेल्यास नितीन पाटील उमेदवार असू शकतात.

पालकमंत्रिपदावर राष्ट्रवादीचेच वर्चस्व. (१९९५ पासून)

  • हर्षवर्धन पाटील - काॅंग्रेस
  • अजित पवार - राष्ट्रवादी
  • दिलीप वळसे-पाटील राष्ट्रवादी
  • जयंत पाटील - राष्ट्रवादी
  • रामराजे नाईक-निंबाळकर - राष्ट्रवादी
  • शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी
  • विजय शिवतारे - शिवसेना
  • बाळासाहेब पाटील- राष्ट्रवादी
  • शंभूराज देसाई - शिवसेना (शिंदे गट)
टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसShambhuraj Desaiशंभूराज देसाई