साधन चरित्र समितीवर नियुक्ती
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : महाराष्ट्र शासनाच्या अण्णा भाऊ साठे चरित्र साधन समितीवर प्रा. डॉ. शरद गायकवाड यांची नुकतीच शासनाकडून नियुक्ती करण्यात आली. प्रा. गायकवाड हे मूळचे सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथील आहेत. ते सध्या कोल्हापूर येथील महावीर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून कार्यरत आहेत.
प्रा. शरद गायकवाड हे सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. त्यांनी आतापर्यंत धनगर व मराठा समाजातील ३४ विवाहांत सत्यशोधक पद्धतीचे पौराहित्य केले आहे. संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गोवा या ठिकाणी हजारो व्याख्याने दिली आहेत. ३८ पोतराजांचे जटानिर्मूलन केले. अण्णा भाऊ साठे यांचे बंधू शंकर साठे यांच्यावर पहिले संशोधन शिवाजी विद्यापीठात सादर केले आहे.
अंगापूर ते मास्को रशिया असा प्रवास करून थायलंड, बँकॉक येथे व्याख्यान दिली आहेत. यापूर्वी लहूजी साळवे मातंग आयोगाचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. मातंग समाजाचा अडीच हजार वर्षांच्या इतिहासाचा अभ्यास करून त्यांनी २००८ मध्ये शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. मिळवली आहे. फुले, शाहू, आंबेडकर, मुक्ता साळवे, लहूजी साळवे, अण्णा भाऊ साठे यांच्यावरील त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.
आयकार्ड फोटो आहे